Big Bash League: आपण लहानपणापासून क्रिकेट (Cricket) पाहतो. बॉलने टप्पी घेत बाँड्री पार करत केला तर चौकार अन् थेट बॉलने बाँड्री पार केली तर सिक्स हे तर सर्वांना माहित आहे. मात्र, बॉलने बाँड्री पार न केला आणि सिक्स (SIX) देण्यात आलाय, असं कधी पाहिलं किंवा ऐकलंय का?, होय...असंच झालंय. मेलबर्न रेनेगेड्स (Melbourne Renegades) विरुद्ध मेलबर्न स्टार्स (Melbourne Stars) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात असा प्रकार पहायला मिळाला आहे. (Big Bash League Ball Hits Roof of the Stadium Umpire signals Six Runs what the ICC rules Watch video marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बिग बॅश लीग स्पर्धा (Big Bash League) आता रोमांचक स्थितीत पोहोचली आहे. या स्पर्धेतील एका सामन्यात विचित्र दृश्य पाहण्यात मिळालं. मेलबर्न रेनेगेड्स विरुद्ध मेलबर्न स्टार्स (Melbourne Renegades vs Melbourne Stars) यांच्यात खेळल्या जाणार्‍या सामन्याच्या दुसऱ्या डावात बॉल बाँड्रीच्या दिशेने न जाता स्टँडच्या छतावर आदळला (Ball Hits Roof of the Stadium) आणि परत जमिनीवर पडला, त्यानंतर अंपायरने त्याला सिक्स (Umpire signals Six) घोषित केलं.


पाहा नेमकं काय झालंं?



अंपायरच्या या निर्णयाने बॉलरसोबतच फलंदाजी करणाऱ्या टीमच्या खेळाडूंनाही आश्चर्याचा धक्का बसला. पण आयसीसीच्या नियमांनुसार (ICC Rules) बॉल टोलवल्यानंतर चेंडू स्टेडियमच्या छताला लागला तर त्याला षटकार दिला जातो. या सामन्यातही असंच काहीसं घडलंय. बॅटला लागताच चेंडू इतका उंच गेला की छतावर आदळला आणि षटकार दिला. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर (Viral Video) वेगाने व्हायरल होत आहे.


आणखी वाचा - Dewald Brevis : याला म्हणतात परफेक्ट यॉर्कर, फलंदाजाच्या बत्त्या गुल, Video पाहून व्हाल थक्क!


दरम्यान, बिग बॅशच्या 41 व्या सामन्यात मेलबर्न रेनेगेड्सने मेलबर्न स्टार्सचा दणक्यात पराभव केलाय. मेलबर्न रेनेगेड्सने हा सामना 6 धावांनी जिंकला. अखेरच्या षटकात 12 धावांची गरज असताना मेलबर्न रेनेगेड्सने कडवी झुंज दिली आणि सामना खिश्यात घातला. सलामीवीर Joe Clarke ने या सामन्यात 59 धावांची धुंवाधार खेळी केली आहे.