Cameron Green: ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आजारी असल्याचं समोर आलंय. कॅमरून ग्रीन गेल्या काही काळापासून किडनीच्या गंभीर आजाराने त्रस्त असल्याचा खुलासा झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

7 Cricket ला दिलेल्या एका इंटरव्ह्यूमध्ये कॅमेरून म्हणाला की, ज्यावेळी माझा जन्म झाला होता, त्यावेळी माझ्या आई वडिलांना सांगण्यात आलं होतं ती, मला किडनीसंदर्भात ( chronic kidney disease ) गंभीर आजार आहे. मात्र मला याची कोणतीही लक्षणं जाणवली नाही. नुकत्याच केलेल्या अल्ट्रासाऊंडमधून मला याबाबत माहिती मिळाली. 


कॅमरूनची आई बी ट्रेसी म्हणाली, “किडनीच्या झडपांमध्ये ( urethral valve ) अडथळे येत असल्याने युरीनचा प्रवाह मागे म्हणजेच पुन्हा किडनीकडे होते. हे नीट विकसित होत नाहीये. त्यामुळे खूप धक्का बसला होता.