Wanindu Hasaranga Ruled Out IPL 2024 : गुजरात आणि हैदराबाद (GT vs SRH) यांच्यामध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना सुरू असतानाच हैदराबादच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. हैदराबादची (Sunrisers Hyderabad) मालक काव्या मारन हिच्यासाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. हैदराबादने खरेदी केलेला स्टार फिरकी गोलंदाज वनिंदू हसरंगा (Wanindu Hasaranga) आयपीएलमधून बाहेर गेला आहे. एकहाती सामना फिरवण्याची ताकद ठेवणाऱ्या हसरंगाने माघार घेतल्याने आता हैदराबादची ताकद कमी झाली आहे. त्याचा फटका नक्कीच सनरायझर्संला बसेल, असं क्रिडा तज्ज्ञांनी म्हटलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनिंदू हसरंगा हा श्रीलंकन खेळाडूला हैदराबादने 1.5 कोटींना खरेदी केले होते. वनिंदू हा फिरकी गोलंदाजीकरीता ओळखला जातो. आयपीएलच्या आधीच्या हंगामात वनिंदू आरसीबीकडून खेळला होता. एकदिवसीय कसोटी मालिकेत आणि टी-20 सामन्यात वनिंदूने दमदार कामगिरी केली होती. मात्र, गेल्या दोन महिन्यांपासून हसरंगाला दुखापतीने ग्रासलं आहे. त्यामुळे तो आयपीएल देखील मुकणार, अशी शक्यता वर्तविली जात होती. वनिंदूला झालेल्या गंभीर दुखापतीमुळे हैदराबादसमोर आयपीएल जिंकण्यासाठी मोठं आव्हान उभं राहिलं आहे.



वानिंदु हसरंगाच्या डाव्या टाचेला दुखापत झाली होती. हसरंगा दुखापतीवर उपचार घेण्यासाठी तो दुबाईला जाणार असल्याचं श्रीलंका क्रिकेटचे सीईओ यांनी म्हटलं आहे. आगामी टी-ट्वेंटी वर्ल्ड कपपूर्वी त्याने फिट होण्याचा निर्धार केल्याचं देखील त्यांनी सांगितलंय. त्यामुळे आता आगामी टी-ट्वेंटी वर्ल्डमध्ये हसरंगा आपल्या फिरकीची जादू दाखवणार हे नक्की झालंय. 


सनरायझर्स हैदराबादचा संपूर्ण संघ:


ट्रॅव्हिस हेड, मयंक अग्रवाल, अभिषेक शर्मा, एडन मार्कराम, हेनरिक क्लासेन (w), अब्दुल समद, शाहबाज अहमद, पॅट कमिन्स (c), भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, जयदेव उनाडकट, नितीश रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर, उमरान मलिक, ग्लेन फिलिप्स, उपेंद्र यादव, राहुल त्रिपाठी, टी नटराजन, अनमोलप्रीत सिंग, सुब्रमण्यन, सनवीर सिंग, फजलहक फारुकी, मार्को जानसेन, आकाश महाराज सिंग.