Player Injured: यंदाचा वनडे वर्ल्डकप भारतात आयोजित केला गेला आहे. दरम्यान रविवारीच टीम इंडिया विरूद्ध ऑस्ट्रेलिया यांचा सामना रंगला असून भारताने यामध्ये 6 विकेट्सने विजय मिळवलाय. तर पॉईंट्स टेबलमध्ये न्यूझीलंडची टीम सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडने इंग्लंडचा 9 विकेट्सने पराभव केला आहे. मात्र आता किवींच्या टीमसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडच्या टीमचा धडाकेबाज खेळाडू आणि नियमित कर्णधार केन विलियम्सन ( Kane Williamson ) वर्ल्डकपच्या दुसऱ्या सामन्यातून देखील बाहेर पडला आहे. टीमच्या प्रमुख कोचने याबाबत माहिती दिली आहे.


न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का


वर्ल्डकप 2023 मध्ये पहिला सामना जिंकून पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर असलेल्या न्यूझीलंडच्या टीमला मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार फलंदाज केन विलियम्सन ( Kane Williamson ) नेदरलँडविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यातून बाहेर पडलाय. न्यूझीलंडचे मुख्य प्रशिक्षक गॅरी स्टेड यांनी केनच्या दुखापतीबाबत ही माहिती दिली आहे. 


नेदरलँड्सविरूद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत कोच म्हणाले, 'केन ( Kane Williamson ) चांगल्या पद्धतीने रिकव्हर होतोय. मला वाटतंय की, फिल्डींग त्याच्यासाठी अजूनही महत्त्वाची आहे. त्याल फक्त थोडं आणि चांगले करणं आवश्यक आहे. यानंतर त्यांच्या खेळावरही आत्मविश्वास निर्माण होईल.


आयपीएलदरम्यान केनला झाली होती दुखापत


केन विलियम्सन ( Kane Williamson ) यंदाच्या आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सच्या टीमकडून खेळत होता. यावेळी पहिल्याच सामन्यात त्याला दुखापत झाल्याचं समोर आलं होतं. केनच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. यामुळे तो बराच काळ क्रिकेटच्या मैदानापासून दूर होता. 


इंग्लंडविरूद्धच्या सामन्यात न्यूझीलंडचा दमदार विजय


इंग्लंडविरुद्धच्या सलामीच्या सामन्यात न्यूझीलंड टीमने 9 विकेट्स राखून विजय मिळवला होता. इंग्लंडने दिलेलं 283 रन्सटं आव्हान टीमच्या दोन फलंदाजांनी सहजरित्या पार केलं. ओपनर डेव्हॉन कॉनवे (152) आणि रचिन रवींद्र (123) यांनी टीमकडून शानदार शतकी खेळी खेळली. सध्या किवींची टीम 2 पॉईंट्सह पहिल्या क्रमांकावर आहे.