मुंबई : यंदाच्या आयपीएलमध्ये 7 व्या क्रमांकावर असलेल्या कोलकाता नाईट रायडर्सला एक मोठा धक्का बसला आहे. आयपीएलमध्ये दुखापतीची मालिका सुरुच आहे. केकेआरच्या टीममधून दुखापतीमुळे एक खेळाडू माघार घेणार आहे. यामुळे कोलकाता नाईड रायडर्सचा मालक शाहरूख खानच्या अडचणीत वाढ झाली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोलकाता टीमचा दिग्गज वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स दुखापतीमुळे आयपीएलमधून बाहेर पडला आहे. कमिन्सला हिपची दुखापत झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान त्याची ही दुखापत जास्त गंभीर नसली तरीही त्याचं इंटरनॅशनल शेड्यूल पाहता तो आयपीएलमधील पुढील सामने खेळणार नाहीये.


आयपीएल 2022 मध्ये कोलकाता टीम प्लेऑफ गाठण्याची शक्यता खूपच कमी आहे. अशातच पॅट कमिन्स पुन्हा मायदेशी जात असल्याने कोलकाता टीमच्या अडचणीत आणखीनच वाढ झाली आहे. ऑस्ट्रेलिया क्रिकेट टीमला पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जायचं असून पॅट कमिन्स पूर्णपणे तंदुरुस्त असणं  हे अत्यंत महत्त्वाचं आहे.


दरम्यान पॅट कमिन्स श्रीलंकेविरुद्धच्या टी-20 मालिकेत सहभागी होऊ शकणार नाही. तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेदरम्यान तो टीमचा भाग नसल्याची घोषणा आधीच करण्यात आली होती. मात्र कमिन्स कसोटी फॉरमॅटमध्ये टीमचं नेतृत्व करताना दिसणार आहे.