Rohit Sharma: टीम इंडियाला मोठा धक्का! कर्णधार रोहित शर्माला दुखापत; श्रीलंकेविरूद्ध खेळण्यावर प्रश्नचिन्ह
Rohit Sharma: यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय.
Rohit Sharma: गुरुवारी वर्ल्डकपच्या ( ICC Cricket World Cup 2023 ) स्पर्धेत टीम इंडिया विरूद्ध श्रीलंका यांच्यात सामना रंगणार आहे. मुंबईच्या वानखेडे मैदानावर हा सामना रंगणार असून कर्णधार रोहित शर्माच्या ( Rohit Sharma ) होम ग्राऊंडवर सामना असल्याने चाहते फार उत्सुक आहेत. मात्र यावेळी चाहत्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे. याचं कारण म्हणजे श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दुखापतग्रस्त असल्याचं समोर आलंय.
यंदाच्या वर्ल्डकपमध्ये टीम इंडिया चांगला खेळ करतेय. टीम इंडियाने आतापर्यंत 6 सामने खेळले असून या सर्व सामन्यांमध्ये विजय मिळववला आहे. या सर्व सामन्यांमध्ये कर्णधार रोहित शर्माचं ( Rohit Sharma ) मोठं योगदान असल्याचं दिसून आलंय. मात्र श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खेळणार का, यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
Rohit Sharma च्या बोटाला दुखापत
या वर्ल्डकपमध्ये टीमचे नेतृत्व करण्याची जबाबदारी रोहित शर्मावर ( Rohit Sharma ) सोपवण्यात आली असून त्यात तो पूर्णपणे यशस्वी ठरताना दिसतो. केवळ कॅप्टन्सी नाही तर फलंदाजीमध्येही रोहितची कामगिरी चांगली दिसून येते. मात्र भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या सामन्यापूर्वी सोशल मीडियावर एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यामध्ये त्याच्या हाताच्या बोटावर पट्टी बांधलेली दिसतेय. ( हा फोटो व्हायरल झाला असून झी 24 तास याची खातरजमा करत नाही. )
दरम्यान रोहित शर्माचा ( Rohit Sharma ) हा फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांच्या मनात धस्स झालंय. या फोटोनंतर असा अंदाज लावण्यात येतोय की, बोटाला झालेल्या दुखापतीमुळे रोहित शर्मा ( Rohit Sharma ) आगामी सामना मिस करू शकतो. जर श्रीलंकेविरूद्धच्या सामन्यात रोहित शर्मा ( Rohit Sharma ) खेळण्यासाठी उतरला नाही, तर टीमच्या कर्णधारपदाची धुरा कोणत्या खेळाडूच्या खांद्यावर दिली जाणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
रोहित खेळला नाही तर 'हा' खेळाडू करणार टीमचं नेतृत्व
रोहित शर्मा ( Rohit Sharma ) दुखापतीमुळे गुरुवारच्या सामन्यातून बाहेर पडला तर त्याच्या जागी कर्णधारपदाची जबाबदारी केएल राहुलला सोपवली जाऊ शकते. अशावेळी इशान किशनला शुभमन गिलसोबत ओपनिंगला पाठवता येईल. या वर्ल्डकपमध्ये रोहितने आतापर्यंत 398 रन्स केले आहेत. मात्र रोहितची दुखापत जास्त गंभीर नसल्यास श्रीलंकेविरूद्ध तो मैदानात उतरू शकतो.