Shubman Gill : वनडे वर्ल्डकपला सुरुवात झाली असून येत्या 8 ऑक्टोबर रोजी टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाविरूद्ध पहिला सामना खेळायचा आहे. मात्र या सामन्यात टीम इंडियाचा स्टार खेळाडू शुभमन गिल खेळणार नसल्याची शक्यता आहे. शुभमन गिलला डेंग्यू झाला असल्याचं समोर आलंय. वर्ल्डकप सुरु असताना शुभमन आजारी पडल्याने टीम इंडियाची चिंता वाढली आहे. 


शुभमन गिलला डेंग्यूची लागण


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शुभमनची तपासणी करण्यात आली, त्यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यानंतर त्याला डेंग्यूची लागण झाल्याचं समोर आलंय. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी तो आजारी पडला आहे. अशा परिस्थितीत हा भारतीय टीम इंडियासाठी मोठा धक्का मानला जात आहे. यावेळी पहिल्या सामन्यात तो खेळणार नसल्याची शक्यता वर्तवण्यात येतेय.


शुभमनवर उपचार सुरु


टीम इंडिया रविवारी चेन्नईमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्डकपची सुरुवात करणार आहे. अशा परिस्थितीत या सामन्यापूर्वी टीम इंडिया स्टार फलंदाज शुभमन गिलशिवाय मैदानात उतरण्याची शक्यता वर्तवण्यात येतेय. इतकंच नाही तर शुभमन गिल गुरुवारी एमए चिदंबरम स्टेडियमवर झालेल्या टीम इंडियाच्या नेट सेशनमध्येही सहभागी झाला नव्हता. यानंतर त्याच्या डेंग्यूशी संबंधित चाचण्या करण्यात आल्या, त्यानंतर त्याच्यावर उपचार सुरू आहेत.


ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार शुभमन गिल?


मिळालेल्या माहितीनुसार, टीम इंडियाची मॅनेजमेंट गिलच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवून आहे. शुक्रवारी शुभमनची पुन्हा एकदा चाचणी होणार आहे. यानंतरच शुभमन गिल ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार की नाही हे ठरवण्यात येणार आहे.