मुंबई : बीसीसीआय सचिव जय शाह (Bcci Jay Shah) यांच्या वक्तव्यामुळे पाकिस्तानला चांगलीच मिर्ची झोंबलीय. टीम इंडिया (Team India) 2023 ला होणाऱ्या आशिया कपसाठी (Asia Cup) पाकिस्तानला जाणार नाही, असं वक्तव्य केलं. यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाकडून (Pakistan Cricket Board) उत्तर आलंय. जर असंच होणार असेल तर आम्ही भारतात होणाऱ्या वनडे वर्ल्ड कपमधून (World Cup 2023) माघार घेऊ, अशी पाकिस्तानने भूमिका घेतलीयं. (big controversy in ind and pak after bcci secretary jay shah 2023 asia cup team india statement)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

"पाकिस्तान मोठा निर्णय घेण्यासाठी सज्ज आहे. मात्र असं करताना आयसीसी (Icc) आणि एसीसीच्या (Acc) नियमांचं भंग होणार नाही, याचीही काळजी घेईल. तसेच भारतात 2023 ला होणाऱ्या वर्ल्ड कपमधून पाकिस्तान नाव मागे घेऊ शकते", अशी माहिती पीटीआयने पीसीबी अध्यक्ष रमीज राजा (Ramiz Raja) यांच्या जवळच्या सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. मात्र पीसीबीकडून याबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.


जय शाह काय म्हणाले होते? 


"आशिया कप 2023 त्रयस्थ ठिकाणी खेळवला जाईल. केंद्र सरकार टीम इंडिया पाकिस्तानला जाणार की नाही, याबाबतचा निर्णय घेते. त्याबाबत आम्ही काहीच प्रतिक्रिया देणार नाही. मात्र आशिय कपचं आयोजन हे न्यूट्रस वेन्यूला होणार हे निश्चिकत आहे", अशी प्रतिक्रिया जय शाह यांनी दिली. 


दरम्यान 23 ऑक्टोबरला टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला सुरुवात होणार आहे. टीम इंडिया पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलं आहे.