Suryakumar Yadav: सूर्याने घेतलेल्या कॅचवरून मोठा वाद; बाऊंड्री लाईन मागे ढकलण्याचं नेमकं प्रकरण काय? पाहा
Suryakumar Yadav Catch Controversy: टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये सूर्यकुमार यादवने डेविड मिलरचा मॅच विनिंग कॅच पकडला. मात्र बाऊंड्री लाईनवर पकडलेल्या या कॅचमुळे मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं.
Suryakumar Yadav Catch Controversy: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 29 जून रोजी इतिहास रचला. टीम इंडियाने बार्बाडोसमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत टी-20 वर्ल्डकप जिंकला. या सामन्यामध्ये टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, गोलंदाज जसप्रीत बुमराह, हार्दिक पंड्या यांची प्रचंड चर्चा झाली. तर दुसरीकडे सूर्यकुमार यादवने पकडलेला कॅच देखील चर्चेचा विषय ठरला आहे.
सूर्याकुमारने पकडलेल्या कॅचमुळे मोठा वाद
टी-20 वर्ल्डकप 2024 मध्ये सूर्यकुमार यादवने डेविड मिलरचा मॅच विनिंग कॅच पकडला. मात्र बाऊंड्री लाईनवर पकडलेल्या या कॅचमुळे मोठा वाद झाल्याचं पहायला मिळालं. या कॅचवरून सूर्यावर अनेकांनी टीका देखील केल्या.
शॉन पोलॉकने दिलं उत्तर
टीका करणाऱ्या व्यक्तींना हा कॅच चुकीचा असल्याचं म्हटलंय. तर दुसरीकडे कॅच दरम्यान सूर्याच्या पायाने बाऊंड्री लाईनला पाय लागल्याचं काहींचं मत आहे. तर कॅच घेण्यापूर्वी बाऊंड्री लाईन मागे ढकलली गेली. या दाव्यांसोबतच हे लोक काही फोटोही शेअर करतायत. पाय सीमेला स्पर्श करण्याच्या मुद्द्यावर, दक्षिण आफ्रिकेचा माजी अष्टपैलू शॉन पोलॉकसह अनेक दिग्गजांनी सडेतोड उत्तर दिलंय. त्याने हा झेल योग्य असल्याचे घोषित केलंय. आता जोपर्यंत सीमारेषा मागे ढकलण्याचा प्रश्न येतो तोपर्यंत हा वादही चुकीचा आहे.
बाऊंड्री लाईन मागे ढकलण्याबाबत सत्य नेमकं काय?
फोटो शेअर करताना काही लोकांनी म्हटलंय की, जेव्हा सूर्याने कॅच घेतला तेव्हा तिथे दोन बाऊंड्री लाईन दिसत होत्या. पांढऱ्या रंगाची पट्टी एका रेषेच्या स्वरूपात दिसत होती. तर त्यामागे एक वेगळीच बाऊंड्री दिसत असल्याचं समोर आलं. दरम्यान आता समीक्षकांचा दावा आहे की, खरी बाऊंड्री ही पांढरी रेषा होती, परंतु शेवटच्या ओव्हरपूर्वी बाऊंड्री त्या पांढऱ्या रेषेच्या मागे सरकली होती.
दरम्यान हा दावा पूर्णपणे चुकीचा आहे. सत्य हे आहे की, ती दिसणारी बाऊंड्री लाईन या मैदानावर खेळल्या गेलेल्या शेवटच्या सामन्यात होती. शेवटच्या सामन्यात बाऊंड्री फक्त त्या पांढऱ्या रेषेपर्यंत होती. पण अंतिम फेरीत खेळपट्टीनुसार, बाऊंड्री लहान दिसत होती, त्यामुळे विजेतेपदाच्या सामन्याआधीच बाऊंड्री लाईन पांढऱ्या रेषेच्या मागे ढकलण्यात आली होती. म्हणजेच अंतिम सामन्यापूर्वीच पांढऱ्या रेषेमागील बाऊंड्री निश्चित करण्यात आली होती.