दुबई : दुबईमध्ये टी-20 वर्ल्डकपला सुरुवात झाली आहे. मात्र दुबईच्या खेळपट्टीवर पॉवर हिटर फलंदाज काही खास प्रमाणात कामगिरी करू शकलेले नाहीत. अशातच ऑस्ट्रेलियाच्या स्टार फलंदाजाने टीमसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया फलंदाज स्टीव स्मिथने टीमसाठी फलंदाजीचा क्रम बदलण्याचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नेहमी तिसऱ्या क्रमांकवर फलंदाजी करण्यासाठी उतरणारा स्मिथ परिस्थिती जाणून घेऊन क्रमवारीमध्ये खालच्या क्रमांकावर उतरण्यासाठी तयार झाला आहे. गरज पडल्यास क्रमवारीत खाली उतरण्यासाठी तयार असल्याचं स्मिथने स्पष्ट केलं आहे.


आतापर्यंत यूएईच्या खेळपट्ट्यांवर फटके खेळणं सोपं नसल्यामुळे वर्ल्डकपमध्ये जवळपास सर्वच संघ 150 धावांचा टप्पा गाठण्यासाठी धडपडत आहेत.


cricket.com.auशी बोलताना स्मिथ म्हणाला, "माझी भूमिका पूर्वीच्या तुलनेत थोडी बदलली आहे. जेव्हा टॉप ऑर्डर मी चांगली कामगिरी करू शकत नाही  त्यावेळी डाव सावरणं आणि माझ्यासोबत जे काही फलंदाज आहेत त्यांच्याशी भागीदारी करणे हे माझे काम आहे."


तो पुढे म्हणाला, "जर आमची टॉप ऑर्डर चांगली कामगिरी करेल तर मी फलंदाजी क्रमाने खाली जाऊ शकतो जेणेकरून आमच्या स्फोटक फलंदाजांना मोठे शॉट्स खेळण्याची संधी मिळेल. ही माझी भूमिका नक्कीच आहे. आमच्या सराव सामन्यात आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात मी ती भूमिका चोख बजावली असं मला वाटतं."


मला माहिती आहे मला नेमकं काय करायचं आहे. आणि बाकीची संपूर्ण टीम माझी भूमिका जाणते. आम्हाला ज्या पद्धतीने खेळायचं आहे त्याबाबत आमचं मत स्पष्ट आहे, असंही स्मिथने सांगितलंय.