BCCI चा मोठा निर्णय, IPL मध्ये आणखी 2 संघाचा समावेश
आयपीएलमधील संघ वाढणार...
मुंबई : बीसीसीआयने IPL च्या दोन नव्या संघांना मान्यता दिली आहे. आयपीएल 2022 पासून हे दोन नवे संघ IPL मध्ये सहभागी होतील. सध्या आयपीएलमध्ये एकंदर 8 संघ आहेत. आता ते वाढून 10 होणार आहेत. बीसीसीआयच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हा निर्णय घेतला गेला. तर 2028 च्या ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याबाबतही या सभेत चर्चा झाली. मात्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटची शिखर संघटना आयसीसी आणि इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीशी चर्चा करूनच त्याबाबत अंतिम निर्णय घेणार आहे.
गुरुवारी अहमदाबाद येथे झालेल्या वार्षिक सभेत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने मोठा निर्णय घेतला. सन 2022 मध्ये खेळल्या जाणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगमध्ये 8 च्या जागी 10 संघ घेण्याचे मान्य केले आहे. ही बैठक सुरू होण्यापूर्वीच या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय टी20 स्पर्धा असलेल्या आयपीएलमध्ये आता 10 संघ खेळताना दिसणार आहेत.
या बैठकीत बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यासह सर्व अधिकारी उपस्थित आहेत. या बैठकीत अनेक महत्त्वाच्या मुद्दय़ांवर चर्चा झाली.