मुंबई : जगप्रसिद्ध फुटबॉलपटू आणि फुटबॉलचा जादूगार म्हणून ओळख असणाऱ्या अर्जेंटिना संघातील माजी खेळाडू दिएगो मॅराडोना यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या 60 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मॅराडोना Diego Maradona  यांच्या वकिलानं यासंदर्भातील माहिती दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हृदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झालं अशी प्राथमिक माहिती समोर येत आहे. सूत्रांच्या माहितीनुसार मागील काही काळापासून त्यांच्या प्रकृतीबाबत काही तक्रारीही समोर आल्या होत्या. काही आठवड्यांपूर्वी त्यांच्यावर तातडीनं subdural haematoma ची शस्त्रक्रियाही करण्यात आली होती.  


 


'हँड ऑफ गॉड' Hand of god म्हणूनही मॅराडोना यांची ओळख होती. त्यांनी अर्जेंटिनाच्या संघाकडून 34 गोल करत तब्बल 91 गोल करण्यासाठी मोलाचं सहकार्य केलं होतं. अखंड फुटबॉल कारकिर्दीमध्ये त्यांनी 259 गोल केले आहेत. हे गोल त्यांनी क्लब आणि इतर संघांकडून खेळताना केले आहेत. 



मॅराडोना यांच्या निधनाचं वृत्त कळतातच सर्वच स्तरांतून दु:ख व्यक्त करण्यात आलं. बहुविध क्षेत्रातील दिग्गज आणि जगभरातील फुटबॉल प्रेमींनी या महान खेळाडूला श्रद्धांजली वाहिली.