Akash Deep: पदार्पणाच्या सामन्यात आकाश दीपकडून झाली मोठी चूक; मिळवलेली विकेट गमावली
Akash Deep : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील चौथा सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय. बंगाल टीमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपची ( Akash Deep ) प्लेईंग 11 मध्ये निवड करण्यात आली.
Akash Deep No ball: सध्या भारत विरूद्ध इंग्लंड यांच्यामध्ये 5 सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवण्यात येतेय. रांचीमध्ये चौथा सामना खेळवण्यात येत असून इंग्लंडच्या टीमने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. अशातच टीम इंडिया मजबूत स्थितीत असल्याचं दिसून येतंय. या सामन्यात टीम इंडियाकडून आकाश दीपने ( Akash Deep ) डेब्यू केला. मात्र डेब्यूच्याच सामन्यात त्याने एक चूक केली, ज्याचा परिणाम म्हणजे आऊट होऊन देखील फलंदाजाला नॉट आऊट करार देण्यात आला होता.
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या टेस्ट सिरीजमधील चौथा सामना रांचीतील जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जातोय. बंगाल टीमकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणारा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपची ( Akash Deep ) प्लेईंग 11 मध्ये निवड करण्यात आली. पण डेब्यूच्या टेस्ट सामन्यातच आकाश दीपने ( Akash Deep ) इतकी मोठी चूक केली की ज्याची कोणी कल्पनाही केली नसेल.
आकाशने कोणती अशी मोठी केली चूक?
या सामन्यात इंग्लंडने फलंदाजीचा निर्णय घेतला असून जॅक क्रॉली आणि बेन डकेट इंग्लंड ओपनिंग करण्यासाठी मैदानात उतरले. इंग्लंडच्या पहिल्या डावातील चौथ्या ओव्हरमध्ये पाचव्या बॉलवर आकाश दीपने ( Akash Deep ) जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केलं. पहिली विकेट घेताच आकाश दीपने ( Akash Deep ) विकेटचं सेलिब्रेशन सुरू केले, पण याचवेळी मोठा ट्विस्ट आला.
भारताचा युवा वेगवान गोलंदाज आकाश दीपने ( Akash Deep ) याचवेळी एक मोठी चूक केली. ज्या बॉलवर आकाश दीपने जॅक क्रॉलीला क्लीन बोल्ड केलं तो नेमका त्याने नो बॉल टाकला. जॅक क्रोली क्लीन बोल्ड झाला तेव्हा 4 रन्सवर खेळत होता. या चुकीनंतरही आकाश दीपने हार मानली नाही आणि त्याने बेन डकेट, ऑली पोप आणि जॅक क्रॉलीला स्वस्तात बाद करून टीम इंडियाला विकेट्स मिळवून दिल्या.
टीम इंडियाची प्लेईंग 11
यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, रजत पाटीदार, सरफराज खान, रवींद्र जडेजा, ध्रुव जुरेल (विकेटकीपर), रविचंद्रन अश्विन, आकाश दीप, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज.