मुंबई: क्रिकेट विश्वातील सर्वात मोठी अपडेट हाती येत आहे. सगळ्यांनाच पुढच्या वर्षीच्या IPL 2022 च्या 15 हंगामाचे वेध लागले आहेत. आयपीएल ऑक्शन कधी होणार याची प्रतिक्षा अखेर संपली आहे. IPL 2022 साठी मेगा ऑक्शनच्या तारखा समोर आल्या आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

IPL 2022 मध्ये यावेळी 10 संघ समाविष्ट होणार आहेत. अहमदाबाद आणि लखनऊ असे दोन नवे संघ असणार आहेत. याशिवाय RCB चं कर्णधारपद विराट कोहलीनं सोडल्यामुळे आता नवा कर्णधार कोण? याची उत्सुकताही सर्वांना लागली आहे. 


मिळालेल्या माहितीनुसार आयपीएल 2022 साठीच्या मेगा ऑक्शन या फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात होणार आहेत. BCCI च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार 12 आणि 13 फेब्रुवारी रोजी आयपीएल मेगा ऑक्शन होणार आहेत. बंगळुरूमध्ये आयपीएलचं मेगा ऑक्शन होणार आहे. आता प्रत्येक फ्रान्चायझीने 3 ते 4 खेळाडू रिटेन केले आहेत. 


यंदा 10 संघ असल्याने आता चुरशीची लढत होणार आहे. 14 व्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्स संघाने ट्रॉफी जिंकली होती. चेन्नईनं गेल्या 14 वर्षात चौथ्यांदा विजेतेपदाची ट्रॉफी मिळवली आहे. आता पंधराव्या हंगामाची प्रतिक्षा सर्वांनाच आहे.