कर्णधार रोहित शर्माने यांना दिलं विजयाचं श्रेय!
न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवत सिरीज आपल्या नावावर करून घेतलीये.
रांची : न्यूझीलंडविरूद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताने विजय मिळवत सिरीज आपल्या नावावर करून घेतलीये. न्यूझीलंडने भारतासमोर 154 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. त्यानंतर रोहित आणि केएल राहुल यांनी पहिल्या विकेटसाठी 117 धावांची भागीदारी करत संघाला सहज विजय मिळवून दिला.
विजेतेपदाचं क्रेडिट संपूर्ण टीमचं
रोहित म्हणाला, "सामन्यादरम्यान दव पडल्यामुळे परिस्थिती सोपी नव्हती. संपूर्ण संघाने चांगली कामगिरी केली. फलंदाजी म्हणून न्यूझीलंडची क्षमता आम्हाला माहीत आहे. पण आम्हाला आमच्या स्पिनर्सचीही क्षमता माहीत आहे, मी त्यांना सांगत राहिलो की आम्ही फक्त एक विकेट घेऊन त्यांच्यावर नियंत्रण ठेवू शकतो."
'बेंच स्ट्रेंथ'चं कौतुक करताना तो म्हणाला, 'बेंच स्ट्रेंथचे खेळाडू सातत्याने चांगली कामगिरी करतायत. त्यामुळे मैदानावरील खेळाडूंवर दबाव असतो. त्याला मुक्तपणे खेळण्याचं स्वातंत्र्य देणं माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. हा एक तरुण संघ आहे, ज्यापैकी अनेकांनी जास्त सामने खेळले नाहीत."
हर्षल पटेलचं कौतुक
कालचा सामना हर्षल पटेलसाठी डेब्यू सामना होता. त्याने चांगली कामगिरी करत 25 धावांत दोन विकेट्स घेतले. यावर रोहित म्हणाला, 'हर्षल पटेल नेहमी उत्तम कामगिरी करतो, तो अनेक वर्षांपासून प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतोय. त्याला काय करायचं आहे हे त्याला माहीत आहे."
भारताच्या विजयाचं श्रेय न्यूझीलंडचा कर्णधार टिम साऊदी देत म्हणाला, 'सगळे श्रेय भारताला जातं ज्याने संपूर्ण सामन्यात इतकी चांगली कामगिरी केली.' सामना सुरू होण्यापूर्वीच दव पडायला सुरुवात झाली. आम्हाला माहीत होतं की दव पडेल आणि दोन्ही संघांसाठी हीच परिस्थिती होती. आम्ही पोहोचलो तेव्हा सुरुवातीपासूनच सामन्यावर दव पडलं होतं. पण त्यांनी आज जबरदस्त खेळ दाखवला."