जयपूर : टीम इंडिया विरुद्ध न्यूझीलंड (India vs New Zealand  T 20 Series 2021) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी 20 मालिकेला उद्यापासून (17 नोव्हेंबर) जयपूर (Jaipur) येथे सुरुवात होत आहे. या टी 20 मालिकेतील पहिला सामना जयपूरमधील सवाई मानसिंह स्टेडियममध्ये (Sawai Mansingh Stadium) खेळवण्यात येणार आहे. रोहित शर्मा या मालिकेत भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तसचं राहुल द्रविडसुद्धा मुख्य प्रशिक्षकपदाची सूत्रं स्वीकारणार असल्याने चाहत्यांचं या मालिकेकडे लक्ष लागलंय. मात्र या पहिल्या सामन्याआधी सामन्यावर वायू प्रदूषणाचं (Air Pollution) सावट आहे. त्यामुळे हा पहिला सामना रद्द होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Big threat of air pollution in 1st T20 match between India and New Zealand on November 17 at Sawai Mansingh Stadium in Jaipur)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जयपूर हे प्रदूषित शहरांमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. जयपूरचा हवा गुणवत्ता निर्देशांक 337 पर्यंत घसरला आहे.  यावरुन जयपूरमध्ये किती प्रमाणात वायू प्रदूषण आहे, याची कल्पना करता येईल. दरम्यान आता या सामन्याचं काय होणार, याकडे सर्व क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.


जयपूरमध्ये 8 वर्षांनंतर सामन्याचे आयोजन


भारत-न्यूझीलंड यांच्यातील टी 20 सामन्याच्या निमित्ताने सवाई मानसिंह स्टेडियममध्ये तब्बल 8 वर्षानंतर आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात येणार आहे. टीम इंडिया या स्टेडियममध्ये पहिल्यांदाच टी 20 सामना खेळणार आहे.


याआधी टीम इंडियाने इथे एकूण 13 सामने खेळले आहेत. यामध्ये 12 वनडे आणि 1 कसोटी सामन्यांचा समावेश आहे. या 12 पैकी 8 वनडे सामन्यांमध्ये टीम इंडियाने विजय मिळवला आहे. तर एकमेव कसोटी ही अनिर्णित राहिला होता.


टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.   


टी 20 मालिकेचं वेळापत्रक 


पहिला सामना, बुधवार 17 नोव्हेंबर, जयपूर. 


दुसरा सामना, शुक्रवार 19 नोव्हेंबर, रांची. 


तिसरा सामना, रविवार, कोलकाता.