IPL 2024 Points Table: शुक्रवारी चिन्नस्वामी मैदानावर रॉयल चॅलेंजर बंगळूरू विरूद्ध कोलकाता नाईट रायडर्स यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात कोलकात्याने 7 विकेट्सने बंगळूरूचा पराभव केला. या विजयासह केकेआरने या सिझनमध्ये दुसरा विजय मिळवला आहे. तर आरसीबीचा हा दुसरा पराभव आहे. कोलकात्याच्या विजयामुळे पॉईंट्स टेबलममध्ये मोठा उलटफेर झाला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह, केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये आणखी चांगलं स्थान मिळवलं आहे. यावेळी केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. तर आरसीबी सहाव्या स्थानावर कायम आहे. आयपीएल 2024 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 3 सामन्यांतील हा दुसरा पराभव आहे.


कसं आहे पॉईंट्स टेबलचं गणित?


श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली कोलकाता नाईट रायडर्सने सलग दुसरा सामना जिंकून 2 पॉईंट्स जमा केले आहेत. आता या टीमचे 2 सामन्यात 2 विजयांसह त्यांचे एकूण 4 पॉईंट्स झाले आहेत. यासह, टीमने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरे स्थान काबीज केलंय. यावेळी केकेआरचं नेट रनरेट +1.047 झालंय. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज अजूनही अव्वल स्थानावर आहे. त्यांचे आतापर्यंतचे दोन्ही सामने जिंकून त्यांचे 4 पॉईंट्स झाले आहेत. परंतु +1.979 च्या चांगल्या नेट रन-रेटमुळे, CSK पहिल्या क्रमांकावर आहे.


रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 3 सामन्यांत 1 विजयानंतर 2 पॉईंट्स पटकावलेत. आरसीबीचं नेट रनरेट -0.711 असून ते सहाव्या स्थानावर आहे. KKR चौथ्या स्थानावरून दुसऱ्या स्थानावर पोहोचल्याने, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबादचं यांचं प्रत्येकी एक स्थान नुकसान झालं असून या टीम्स तिसऱ्या आणि चौथ्या स्थानावर आल्यात. RR आणि SRH चे सध्या अनुक्रमे 4 आणि 2 गुण आहेत. पाचव्या स्थानावर पंजाब किंग्ज आहे, ज्यांचे सध्या 2 सामन्यात 1 विजयानंतर 2 गुण आहेत. गुजरात टायटन्सने आतापर्यंत 2 सामन्यांत एक विजय नोंदवला आहे, त्यामुळे ते सध्या सातव्या क्रमांकावर आहेत.


दिल्ली आणि मुंबईच्या टीमला यंदाच्या सिझनमध्ये एकंही विजय मिळवता न आल्याने या दोन्ही टीम्स तळाला आहे. यावेळी दिल्ली कॅपिटल्स आठव्या तर मुंबई इंडियन्स नवव्या क्रमांकावर आहे. यावेळी लखनऊ सुपर जाएंट्सने आतापर्यंत एकचा सामना खेळला असून ते शेवटच्या म्हणजेच 10 व्या क्रमांकावर आहेत.