मुंबई: क्रिकेट विश्वात प्रत्येकाला वेगवेगळी टोपणनावं दिली जातात जसं की विराट कोहलीला चिकू महेंद्रसिंह धोनीला माही आहे तसंच विरेंद्र सेहवागला सचिन तेंडुलकरने एक खास नाव ठेवलं आहे. या नावामागची गंमतही तेवढीच स्पेशल आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विरेंद्र सेहवाग आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी खूप प्रसिद्ध होते. त्यांनी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर कॉमेंट्री आणि सोशल मीडियावर ते सतत अॅक्टीव्ह असतात. सचिनने विरेंद्र सेहवागला  बिरबल नाव ठेवलं आहे. या बिरबल नावामागे नेमकं काय रहस्य आहे याचा उलगडा इरफान पठाणने एका मुलाखतीदरम्यान केला. 


विरेंद्र सेहवागचा सल्ला किंवा त्यांनी सांगितलेल्या गोष्टीमुळे एक सकारात्मक उर्जा मिळायची. त्यांची सांगण्याची पद्धतपण वेगळी होती. काहीही सांगायचं असेल तर ते त्यासाठी बिरबलासारखी गोष्ट सांगायचे आणि त्यातून आपल्याला जो काही सल्ला द्यायचा तो द्यायचे. आपल्यासोबतच्या टीममधील खेळाडूंना ते कायम गोष्टी सांगायचे त्यामुळे त्यांचं नाव सचिनने बिरबल असं ठेवलं होतं. 


विरेंद्र सेहवागने मैदानातील खेळाडूंमध्ये उर्जा निर्माण करायचा. त्यामुळे त्याचे सल्ले आणि गोष्टी देखील सर्वजण आवर्जुन ऐकायचे असंही मुलाखतीदरम्यान इरफान पठान यांनी खुलासा केला.