Hat Trick In 3 Overs: एखाद्या गोलंदाजाने एका ओव्हरमध्ये अथवा 2 ओव्हरमध्ये मिळून हॅट-ट्रीक घेतल्याचं तुम्ही ऐकलं असेल. मात्र कोणी 3 ओव्हरमध्ये हॅट-ट्रीक घेऊ शकतो का? आता हा प्रश्न वाचूनच तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे. पण आज आपण ज्या बर्थ डे बॉयबद्दल बोलणार आहोत त्याने ही अशक्य वाटणारी हॅट-ट्रीक शक्य करुन दाखवली आहे. या खेळाडूने अंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हा पराक्रम केला आहे. या खेळाडूचं नाव आहे मर्व्ह ह्युजेस.


जगावेगळा पराक्रम केला


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मर्व्हने 1988 साली हा अनोखा आणि जगावेगळा पराक्रम केला. ऑस्ट्रेलिया आणि वेस्ट इंडिजदरम्यान पर्थच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात मर्व्हने इतिहास घडवला. पहिल्यांदाच फलंदाजी करणारा वेस्ट इंडिजचा संघ सुस्थितीत होता. व्हिव्ह रिचर्डसन यांनी दमदार शतक झळकावल्याने संघाचा स्कोअर 400 प्लस होता. वेस्ट इंडिज 440 वर 8 बाद या स्कोअरवर खेळत असताना कर्टली अॅब्रोस आणि कर्टन्ली वॉश मैदानात होते.


2 ओव्हरमध्ये 2 लागोपाठच्या बॉलवर 2 विकेट्स


मर्व्ह सामन्यातील 36 व्या ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी आले. अॅब्रोस यांच्या बॅटची कड घेऊन बॉल इयन हॅले यांच्या हातात विसावला. शेवटच्या बॉलवर ही विकेट पडली. त्यानंतर ऑस्ट्रेलियन कर्णधार अॅलन बॉर्डर यांनी ह्यूजेस यांना आराम दिला. केवळ पार्टनरशीप मोडण्यासाठी ह्यूजेस यांच्या हाती बॉल देण्यात आलेला. त्यानंतर टीम मे यांच्या गोलंदाजीवर स्टीव्ह वॉने गस लॉगी यांचा झेल पकडला. बॉर्डर यांनी पुन्हा ह्यूजेस यांना गोलंदाजी दिली. ओव्हरच्या पहिल्याच चेंडूवर व्ह्यूजेस यांनी वेस्ट इंडिजचा 11 वा खेळाडू पॅट्रीक पॅटर्सनला बाद केलं. वेस्ट इंडिजचा डाव 449 वर आटोपला. म्हणजेच व्ह्यूजेस यांनी 2 ओव्हरमध्ये 2 लागोपाठच्या बॉलवर 2 विकेट्स घेतल्या.


असा झाला अनोखा विक्रम


पहिल्या डावामध्ये ऑस्ट्रेलियाने 395 धावांपर्यंत मजल मारली. दुसऱ्यांदा वेस्ट इंडिजचा संघ फलंदाजीसाठी मैदानात आला तेव्हा ह्यूजेस यांनीच बॉल हाती घेत दुसऱ्या डावातील पहिलीच ओव्हर टाकली. या ओव्हरच्या पहिल्याच बॉलवर ग्रॉर्डन ग्रिंडेज एलबीडबल्यू झाले. तिसरी विकेट गेली तेव्हा मैदानावरील कोणाच्याही लक्षात आलं नाही की ह्यूजेस यांनी अनोखा विक्रम केला आहे. खरं तर ही हॅट-ट्रीक 3 वेगवेगळ्या ओव्हरमध्ये दोन वेगवेगळ्या इंनिग्समध्ये आणि 2 वेगवेगळ्या तारखांना झालेली.


13 विकेट्स एकट्याने घेतल्या


वेस्ट इंडिजच्या संघाला दुसऱ्या डावात 349 धावांपर्यंत मजल मारता आली आणि त्यांनी सामना 170 धावांनी गमावला. या स्पर्धेत ह्यूजेसने पहिल्या डावात 5 विकेट्स घेतल्या. तर दुसऱ्या डावात 8 विकेट्स घेतल्या. त्यांनी या सामन्यात 217 धावांच्या मोबदल्यात 13 गडी बाद केलेले. 


पिळदार मिशा...


मर्व्ह ह्युजेस हे 23 नोव्हेंबर 2023 रोजी 62 वर्षांचे झाले. ते त्यांच्या या अनोख्या हॅट-ट्रीकबरोबरच लांबलचक आणि पिळदार मिशांसाठीही ओळखले जातात.