नवी दिल्ली : भारताचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला इटलीच्या टस्कनीमध्ये विवाहबंधनात अडकले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या नवविवाहित दाम्पत्याने रोममध्ये हनीमून साजरा केला. विराट आणि अनुष्का आता भारतात परतलेत. विराट-अनुष्का भारतात परतल्यानंतर आता अनेक नेत्यांनी त्यांचे लग्न आणि देशभक्तीवरुन सवाल उपस्थित करण्यास सुरुवात केलीये. भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांच्यानंतर आता काश्मीर पार्टीचे नेते राकिफ वाणीनेही विराट-अनुष्कावर निशाणा साधलाय.


मीडिया रिपोर्टनुसार, वाणीने विराट-अनुष्काने रोममध्ये हनीमून साजरा केल्यावरुन त्यांच्यावर टीका केलीये. ते म्हणाले, विराट आणि अनुष्का ज्यांना चाहते विरुष्का असं म्हणतात. त्यांनी हनीमूनसाठी फिनलँड हे ठिकाण निवडले. भारतात अशी अनेक ठिकाणी आहेत जिथे हे जोडपे हनीमूनसाठी जाऊ शकले असते. कारण हनीमूनसाठी काश्मीर ज्याला पृथ्वीवरील स्वर्ग म्हटले जाते अशा ठिकाणी जाऊ शकले असते. यामुळे पर्यटनाला चालना मिळाली असती. 


याआधी गुनाचे भाजप आमदार पन्नालाल शाक्य यांनी विराट-अनुष्काच्या परदेशात जाऊन लग्न करण्यावर सवाल उपस्थित केला होता. ते म्हणाले होते, विराटने भारतात पैसा कमावला आणि परदेशात विवाहासाठी गेले. त्यांना आपल्या देशात जागाच मिळाली नाही का?  शाक्य इतक्यावरच थांबले नाहीत तर भगवान राम, कृष्ण, विक्रमादित्य, युधिष्ठिर यांनी याच भूमीवर विवाह केला. तुम्हालाही येथेच लग्न करावयास हवे होते. आमच्यातील कोणीच लग्नासाठी परदेशात जात नाहीत. कोहलीने येथे पैसा कमावला आणि तेथे अब्जावधी खर्च केले. देशासाठी कोणताच सन्मान नाही. यावरुन ते देशभक्त नसल्याचे सिद्ध होते. 


चार वर्षे रिलेशनशिमध्ये राहिल्यानंतर भारताचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. विराट आणि अनुष्काचा इटलीमधील बोर्गो फिनोशिएटो मध्ये हा सोहळा पार पडला.