`Jasprit Bumrah च्या जागी Bobby Deol ला खेळवा`, वर्ल्डकप तोंडावर असताना एकच चर्चा!
काय सांगता! वर्ल्डकपमध्ये बॉबी देओल खेळणार???
Jasprit Bumrah Bobby Deol: आगामी T20 World Cup पूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. टीम इंडियाचा हुकूमी एक्का मानला जाणारा जसप्रीत बुमराह वर्ल्ड कप स्पर्धेतून बाहेर पडला. बुमराहच्या जागी आता मोहम्मद सिराजला (Mohammad Siraj) संघात सामिल करण्यात आलंय. असं असलं तरी, अजूनही बुमराहला (Jasprit Bumrah) टी 20 वर्ल्डकप संघातून बाहेर केलेलं नाही. तो टीमसोबत ऑस्ट्रेलियाला जाईल आणि देखरेखीखाली असणार आहे. (Bobby Deol As Jasprit Bumrah's Replacement)
जसप्रीत बुमराह म्हणजे टीम इंडियाचा (Team India) संकटमोचक. बुमराहाने भारताला अनेक सामने जिंकवून दिले आहेत. बुमराहच्या नसल्याने भारतीय गोलंदाजी कमकुवत झाल्याचं पहायला मिळतंय. मात्र, नेटकऱ्यांनी बुमराहच्या जागी अशा खेळाडूचं नाव सुचवलंय की, तुम्हाला देखील हसू येईल. सध्या सोशल मीडियावर जसप्रीत बुमराहच्या जागेवर बॉलिवूड स्टार बॉबी देओलला (Bobby Deol) संघात स्थान देण्यात यावं, यासाठी जोरदार मागणी होताना दिसत आहे.
T20 World Cup: BCCI च्या चुकीमुळे Jasprit Bumrah जखमी?? 'या' दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!
व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमुळे अभिनेता (Bollywood Actor Bobby Deol) बॉबी देओल चांगलाच चर्चेत आला होता. बॉबी देओलला क्रिकेटची आवड आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीगमध्ये (Celebrity Cricket League) देखील बॉबी खेळतो. त्याच लीग मॅचचा एक व्हिडीओ सध्या तुफान व्हायरल झाल्याचं दिसत आहे. बॉबी आपल्या खास बॉलिंग साठी ओळखला जातो.
पाहा व्हिडीओ-
शॉर्ट लाईनअप आणि यॉर्कर बॉलिंगच्या (Bobby Deol Bowling Video) जोरावर बॉबीने अनेकांच्या दांड्या गुल केल्या आहेत. बुमराह देखील यॉर्कर बॉलिंगसाठी एक्सपर्ट आहे. त्यामुळे बुमराह आणि बॉबी देओलची तुलना होताना दिसत आहे. नेटकऱ्यांनी बुमराहच्या जागी बॉबी देओलला संघात संधी द्यावी, अशी मागणी केली. त्यामुळे सोशल मीडियावर हास्यमय (Funny Memes) वातावरण तयार झालंय.