कार्तिकमुळे सट्ट्यात गमावले पैसे, रचला स्वत:च्याच हत्येचा बनाव
निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.
मुंबई : निदहास ट्रॉफी स्पर्धेतील फायनल सामन्यात दिनेश कार्तिकच्या षटकारामुळे बांगलादेशच्या एका व्यक्तीला सट्टेबाजीत एक लाख रुपये गमवावे लागले. हे पैसे भरु नये यासाठी त्या व्यक्तीने आपल्याच हत्येचा कट रचला होता. हत्येचा कट रचल्याप्रकऱणी या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या सामन्यात विजयासाठी भारताला शेवटच्या चेंडूत पाच धावांची आवश्यकता होती.
श्रीलंकेत झालेल्या तिरंगी मालिकेतील फायनल सामन्यात बांगलादेशविरुद्ध भारताला विजयासाठी पा धावांची गरज होती. यावेळी स्ट्राईक कार्तिककडे होता. कार्तिकने सौम्या सरकारच्या चेंडूवर षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला. बीडीन्यूज24.कॉमच्या बातमीनुसार, २५ वर्षीय आदिल सिकंदरने मेकअप आर्टिस्ट आणि दोन अन्य साथीदारांसह मिळून व्हिडीओ शूट केला.
या व्हिडीओत तीन लोक खोलीत आदिलची हत्या करत असल्याचे दाखवण्यात आले. तसेच त्याच्या गळ्यातून रक्त वाहताना आणि जखम झाल्याचेही दाखवण्यात आले. पोलिसांच्या माहितीनुसार शरीरातून रक्त आल्याचे दाखवण्यासाठी लाल रंगाचा वापर करण्यात आला होता.
हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आदिलने 150000 टका रुपये वाचवण्यासाठी त्याने आपल्याच हत्येचा कट रचला. भारत आणि बांगलादेश यांच्यातील अखेरचा सामना रोमांचक झाला होता. यात दिनेश कार्तिकने शेवटच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराने भारताने जेतेपद उंचावले. कार्तिकने ८ चेंडूत २९ धावांची स्फोटक खेळी केली.