Super Over in World Cup History: यंदाचा वर्ल्डकप ( ICC World Cup 2023 ) एकदम खास मानला जातोय. सध्या लीस स्टेजचे सामने संपुष्टात आले असून आता सेमीफायनलच्या सामन्यांना सुरुवात होणार आहे. 15 तारखेला भारत विरूद्ध न्यूझीलंड ( India vs New Zealand ) आणि 16 नोव्हेंबर रोजी दक्षिण आफ्रिका विरूद्ध ऑस्ट्रेलिया ( Australia vs South Africa ) यांच्यात सामना रंगणार आहे. यानंतर केवळ एकच फायनचा सामना खेळवण्यात येईल. मात्र चाहत्यांच्या मनात आता प्रश्न आता तो म्हणजे फायनलचा सामना टाय झाला तर?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2019 साली झालेल्या वनडे वर्ल्डकपच्या ( ICC World Cup 2023 ) फायनलचं चित्र अजूनही क्रिकेट प्रेमींच्या डोळ्यासमोर आहे. बाऊंड्री काऊंटीनुसार इंग्लंडच्या टीमला विश्वविजेता घोषित करण्यात आलं होतं. दरम्यान या नियमानंतर बराच वाद निर्माण झाला. 


गेल्या वर्ल्डकपमध्ये होता हा वादग्रस्त विधान


शेवटच्या म्हणजे 2019 च्या वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील सेमीफायनल आणि फायनल खूप रोमांचक होते. गेल्या वर्ल्डकपमध्ये अंतिम सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात झाला होता. लंडनमधील लॉर्ड्सवर खेळलेला तो अंतिम सामना बरोबरीत सुटला. यानंतर इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात सुपर ओव्हर खेळवण्यात आली. ही सुपर ओव्हर टाय झाल्यानंतर बाऊंड्री काऊंटच्या ( boundary count rule ) नियमांनुसार, इंग्लंडला वर्ल्डकप विजेता ठरवण्यात आलं. मात्र यामुळे झालेला वाद पाहता ऑक्टोबर 2019 मध्ये हा नियम काढून टाकण्यात आला.


यंदा बाऊंड्री काऊंटचा नियम नाही


हा नियम काढून टाकण्यात आल्याने अंतिम सामन्यात सुपर ओव्हर टाय झाल्यास बाउंड्री काऊंटचा नियम लागू होणार नाही. अशा स्थितीत चाहत्यांमध्ये प्रश्न आहे की, गेल्या वर्ल्डकप्रमाणे समीकरण यावेळीही निर्माण झालं आणि अंतिम सामना आणि त्यानंतर सुपर ओव्हरही टाय झाली तर काय होईल? विजेता कसा घोषित केला जाईल? 


यंदाच्या वर्ल्डकपमध्ये आयसीसीने ( ICC ) कोणताही म्हणजे सेमीफायनल किंवा फायनल सामना टाय झाला तर त्यात सुपर ओव्हर घेण्यात येईल. जर सुपर ओव्हरही बरोबरीत सुटली तर अशावेळी पुन्हा सुपर ओव्हर घेण्यात येईल. जोपर्यंत एखादी टीम विजयी ठरत नाही तोपर्यंत या सुपर ओव्हर्स सुरुच ठेवण्यात येणार आहे.