पहिल्यांदाच बॉलरने हेलमेट घालून केली बॉलिंग
क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही अंपायर, बॅट्समन, विकेटकीपर, क्लोस-इन फील्डरला हेलमेट घालतांना पाहिलं असेल पण कधी बॉलरला हेलमेट घालून बॉलिंग करतांना पाहिलं का?
मुंबई : क्रिकेटमध्ये आतापर्यंत तुम्ही अंपायर, बॅट्समन, विकेटकीपर, क्लोस-इन फील्डरला हेलमेट घालतांना पाहिलं असेल पण कधी बॉलरला हेलमेट घालून बॉलिंग करतांना पाहिलं का?
कोण आहे तो बॉलर
न्यूजीलंडमध्ये हेमिल्टनमध्ये सुरु असलेल्या टी-20 मॅचमध्ये ओटैगोचे फास्ट बॉलर वॉरेन बर्न्सने चक्क हेलमेट घालून बॉलिंग केली.
डिजाईन केला हेलमेट
25 वर्षाचा बर्न्सने नॉर्दर्न नाइट्सच्या बॅट्समन पासून स्वत:च्या रक्षणासाठी हेलमेट घातलं होतं. या हेलमेटला बर्न्स आणि त्याचा कोच रॉब वाल्टरने डिजाईन केला आहे. पाहताना हा सायक्लिंगसाठी वापरला जाणार हेलमेट वाटतो.
सामन्यामध्ये बर्न्सने 33 रन देऊन 3 विकेट घेतले. नॉर्दर्न नाईट्सने 20 ओव्हरमध्ये 212/9 रन केले. बर्न्स त्याच्या टीमला विजय नाही मिळवून देऊ शकला. ओटैगो टीमचा 106 रनने पराभव झाला.
का घालतो हेलमेट ?
कोचने म्हटलं की, बर्न्स बॉलिंग करतांना बॉल टाकल्यानंतर खाली वाकतो. ज्यामुळे त्याचं डोकं हे खालच्या बाजुला जातं. ते त्याच्यासाठी असुरक्षित आहे. जर कोणता बॅट्समन सरळ शॉट मारतो तर यामुळे त्याला बॉल लागू शकतो.