Video: 2024 च्या सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात माईक टायसनचा खळबळजनक पराभव, जॅक पॉलने `G.O.A.T` ला केले थक्क
Jake Paul defeats Mike Tyson: टेक्सास येथे झालेल्या माईक टायसन विरुद्ध जॅक पॉल या बॉक्सिंगच्या सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. यामध्ये अनुभवी बॉक्सर माईक टायसन पराभव झाला.
Mike Tyson vs Jake Paul: अलीकडेच अनुभवी बॉक्सर माइक टायसनला वर्षातील सर्वात मोठ्या बॉक्सिंग सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. अमेरिकेतील टेक्सास येथे झालेल्या या चर्चित सामन्याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले होते. बॉक्सिंग खेळाचं चाहते या सामन्याची वाट बघत होते. टायसनचा जॅक पॉलने पराभव केला. नेटफ्लिक्स स्पर्धेच्या मुख्य स्पर्धेत, जॅक पॉलने दिग्गज बॉक्सरविरुद्ध 2 राऊंड गमावल्यानंतर दमदार पुनरागमन केले. सामना 78-74 अशा गुणांसह जॅक पॉलकडे गेला.
टायसनवर दिसला वयाचा प्रभाव
हा सामना 2024 मधील सर्वात मोठा बॉक्सिंग सामना म्हणून ओळखला जात होता. सगळ्या जगाचे याकडे लक्ष होते. मूळचा यूट्यूबर असलेला बॉक्सर बनलेला जॅक पॉलच्या प्रसिद्धीमुळे आणि माइक टायसनमुळे या सामन्याची चर्चा झाली. स्पष्टपणे या दोन खेळाडूंमध्ये जॅक पॉल सरस होता. वयाचा प्रभाव ५८ वर्षीय माइक टायसन यांच्यावर दिसून आला. कारण माइक टायसनने वेळा वेग कमी केला. सहाजिकच याचे परिणाम टायसनला भोगावे लागले. टायसनने पहिल्या दोन फेऱ्यांमध्ये त्याने कडवी झुंज दिली पण लवकरच जॅकने आठ फेऱ्यांच्या सामन्यात आघाडी घेतली. जॅक पॉलने माईक टायसनला 'G.O.A.T' अर्थात सर्व काळातील सर्वोत्कृष्ट खेळाडू म्हणाले. सामन्याच्या शेवटच्या मिनिटांत जॅक पॉलने माइक टायसनसमोर नतमस्तक झाले.
हे ही वाचा: अमेरिकेत भारताच्या बॉक्सरचा बोलबाला, नीरज गोयतचा ब्राझीलच्या खेळाडूवर एकतर्फी विजय!
मुख्य सामन्यांचे निकाल:
हेवीवेट: जॅक पॉलने माइक टायसनचा पराभव केला.
सुपर लाइटवेट: केटी टेलरने अमांडा सेरानोचा पराभव केला.
वेल्टरवेट: मारिओ बॅरिओसने एबेल रामोसविरुद्ध स्प्लिट ड्रॉसह WBC विजेतेपद राखले.
सुपर मिडलवेट: नीरज गोयतने व्हिंडरसन न्युन्सचा पराभव केला.
नीरज गोयतने केला नूनेसचा पराभव
तत्पूर्वी, बॉक्सिंग स्पर्धेत भारतीय बॉक्सर नीरज गोयतने चमकदार कामगिरी करत ब्राझीलचा बॉक्सर व्हिंडरसन नुनेसचा पराभव केला. हा सामना सहा फेऱ्यांचा होता आणि गोयतने 60-54 गुणांसह एकमताने विजय मिळवला. नीरज गोयतने सुरुवातीपासूनच सामन्यावर वर्चस्व राखत ब्राझीलच्या बॉक्सरला कडवी झुंज दिली. मात्र, सामन्याच्या शेवटी काही प्रेक्षकांनी सामन्यावर टीका केली. याशिवाय महिला बॉक्सिंगचा एक मोठा सामनाही झाला ज्यामध्ये केटी टेलरने अमांडा सेरानोचा पराभव केला.