Neeraj Goyat Won: भारतीय बॉक्सर नीरज गोयतने शुक्रवारी टेक्सासमधील एटी अँड टी स्टेडियमवर बॉक्सिंगच्या स्पर्धेत दमदार विजय मिळवला. नीरजने सुपर-मिडलवेट स्पर्धेत ब्राझीलच्या व्हर्टसन न्युन्सचा पराभव केला.नीरजचा हा सामना माइक टायसन आणि जॅक पॉल यांच्यातील हाय व्होल्टेज सामन्यापूर्वी झाला. टायसनच्या सामन्याकडे जगभरातील चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत. Netflix या कार्यक्रमाचे आयोजन करत आहे.
नीरज गोयत आणि व्हर्टसन न्युन्स यांच्यातील सामना 165 पौंड वजनी गटात झाला. या सहा फेऱ्यांच्या बिगर जेतेपदाच्या लढतीत नीरज गोयतने ६०-५४ अशा फरकाने एकहाती विजय मिळवला. देशातील आघाडीच्या बॉक्सरपैकी एक आणि WBC आशियाई विजेतेपद मिळवणाऱ्या गोयतने पहिल्या फेरीपासूनच ब्राझिलियन बॉक्सरवर वर्चस्व राखले. पहिल्या फेरीपासून शेवटच्या फेरीपर्यंत त्याचेच वर्चस्व राहिले.
33 वर्षीय बॉक्सरने गेल्या पाचपैकी चार सामने जिंकले आहेत. निरांजने गेल्या वर्षी दुसऱ्या फेरीत त्याने फाकोर्न अम्योदवर विजय मिळवला होता. त्याचा प्रतिस्पर्धी नूनेसने अलीकडेच व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये पदार्पण केले आहे. यामध्ये तो मिसफिट्स बॉक्सिंग प्राइम कार्डवर नॅथन बार्टलिंगकडून पराभूत झाला. ब्राझीलचे बॉक्सर फक्त प्रदर्शनीय सामन्यांमध्येच दिसले आहेत.
History has been created
This is a New gateway for young indian boxers to the world of Boxing .This event had a Full House of 90,000 People . it can’t get Bigger. We Made it #neerajgoyat pic.twitter.com/1clcGpTRpJ— Neeraj Goyat (@GoyatNeeraj) November 16, 2024
नीरज गोयत हा मूळचा हरियाणाचा असून त्याने भारतीय बॉक्सर म्हणून उत्तम कामगिरी केली आहे. हरियाणातील बेगमपूर येथे जन्मलेल्या गोयतने 2006 मध्ये वयाच्या 15 व्या वर्षी दहावीत असताना बॉक्सिंगला खूप सुरुवात केली. माजी जागतिक हेवीवेट चॅम्पियन माईक टायसनला त्याचा आदर्श मानून तो खेळात मोठा झाला. खरतर नीरज हा हौशी बॉक्सर म्हणून, गोयत व्हेनेझुएला मधील 2016 ऑलिम्पिक पात्रता फेरीचा प्रयत्न करणारा पहिला भारतीय ठरला. पण त्याने फार कमी फरकाने तो समान गमावला. 2008 च्या युवा राष्ट्रकुल स्पर्धेतही त्याने कांस्यपदक जिंकले होते.
पुढे, एक व्यावसायिक बॉक्सर म्हणून, गोयत WBC (world boxing council) द्वारे रँक मिळविणारा पहिला भारतीय ठरला. एवढंच नाही तर तो 2015 ते 2017 अशी सलग 3 वर्षे WBC आशियाई चॅम्पियन देखील आहे. नीरजने 24 सामन्यांमध्ये 18 विजय, 4 पराभव आणि 2 अनिर्णित असा व्यावसायिक बॉक्सिंग विक्रम केला आहे.
भरोटा सा भर दिया ब्राज़ीलियाँ का
Congratulations Neeraj Goyat .. a super victory .. great skill and showmanship @GoyatNeeraj #TysonPaul pic.twitter.com/4kAySLZHNn
— Randeep Hooda (@RandeepHooda) November 16, 2024
माइक टायसन आणि जेक पॉल यांच्यातील सामन्यापूर्वी, नीरज गोयतने पॉलविरुद्ध टायसनच्या विजयावर 1 मिलियन यूएस डॉलर्स (सुमारे 8.4 कोटी रुपये) पेक्षा जास्त किमतीच्या घरची पैज लावली होती. टायसन जिंकल्यास नीरजलाही बोलीच्या रकमेचा काही भाग मिळेल.