नवी दिल्ली :  ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर असलेल्या भारताने 4 कसोटी सामन्याच्या मालिकेत विजयी सुरुवात केली. पण दुसऱ्या कसोटीत भारताला पराभवाला सामोरे जावे लागले. येत्या गुरुवारपासून तिसऱ्या कसोटी सामन्याला सुरुवात होत आहे. दुसऱ्या कसोटी सामन्यात पराभव स्वीकारल्यानंतर तिसऱ्या कसोटीत भारत आघाडी घेण्याच्या प्रयत्नात असेल. भारत आणि ऑस्ट्रेलिया प्रत्येकी 1-1 सामना जिंकले आहेत. त्यामुळे मालिकेच्या दृष्टीने तिसरा कसोटी सामना हा निर्णायक ठरणार आहे. तिसरा कसोटी सामाना हा भारतासाठी 'बॉक्सिंग डे टेस्ट' असणार आहे.


बॉक्सिंग डे टेस्ट


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवसापासून म्हणजेच 26 डिसेंबरला खेळल्या जाणाऱ्या मॅचला बॉक्सिंग डे टेस्ट म्हंटले जाते. ऑस्ट्रेलियात 'बॉक्सिंग डे टेस्ट' सामना1980 सालापासून दर वर्षी मेलबर्नवर खेळला जातो. याआधी भारताने दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड या देशात बॉक्सिंग डे टेस्ट सामने खेळले आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेत 5 कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी 4 सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले तर एका सामान्यात विजय मिळाला. 1998 साली भारताने न्यूझीलंड विरुद्ध कसोटी सामना खेळला होता. या सामन्यात भारताचा पराभव झाला होता. याशिवाय भारताने कोलकातामध्ये 1987 ला वेस्टइंडिज सोबत बॉक्सिंग डे टेस्ट सामना खेळला होता. हा सामना अनिर्णित राहीला होता.  


भारताची कामगिरी


भारताने बॉक्सिंग डे टेस्ट सामन्यांमध्ये निराशाजनक कामगिरी केलेली आहे. भारताने एकूण 14 बॉक्सिंग डे टेस्ट सामने खेळले आहेत. त्यापैकी भारताला केवळ एकच सामना जिंकता आला आहे. तर दहा वेळा पराभव स्वीकारावा लागला आहे. तर तीन सामने ड्रॅा झाले आहेत. या 14 सामन्यांपैकी भारताने 7 सामने ऑस्ट्रेलियात खेळले आहेत. या पाचही सामन्यांमध्ये भारताला पराभव स्वीकारावा लागला तर, दोन सामने अनिर्णित राहिले होते. भारताने 1991, 1999, 2003, 2007 आणि 2011 साली मेलबर्नमध्ये पाच सामने गमावले आहे.