मुंबई : ब्राजील फुटबॉल जगातील दिग्गज खेळाडू 'काका' याच्या खेळाचे जगभरात दिवाने आहेत. मात्र आता त्याच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी आहे. 


अलविदा ! 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या ३५ व्या वर्षी 'काका' या ब्राजीलच्या खेळाडूने खेळातून संन्यास घेत असल्याची घोषणा केली आहे. २००२ साली ब्राजीलसोबत फीफा विश्व कप जिंकणारा काका आता चाहत्यांना खेळताना दिसणार नाही. ऑरलेंडो सिटीसोबत त्याने शेवटची मॅच खेळली आहे. 


काकाने सोशल मीडियावरही पोस्ट लिहून चाहत्यांचे आभार मानले आहेत. सोबतच नव्या प्रवासाची सुरूवात करत असल्याची माहितीदेखील त्याने दिली आहे.  


उत्तम खेळाडू 


काका हा ब्राझिल या राष्ट्रिय टीमकडून सुमारे 95 सामने खेळला आहे. २००७ साली त्याला फीफाचा सर्वोत्तम खेळाडू या पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २००१ साली साओ पाउलो मधून त्याने आपल्या करियरला सुरूवात केली. 
२००३ साली एसी मिलान सोबत काकाची गट्टी जमली आणि त्याचं करियर नव्या उंचीवर गेलं . 


सहा वर्ष काका मिलानसोबत होता. यादरम्यान काकाने स्कुडेट्टो 2003-04), सुपरकोप्पा इटालियाना (2004), यूईएफए सुपर कप (2007), फीफा क्लब विश्व कप (2007) आणि  चॅम्पियन लीग ((2007)  मध्ये किताब मिळावले. 


२००९ साली 'रिएल' ने  काकाची खरेदी सुमारे ६.७ करोड युरोमध्ये केली. या सोबत कोपा डेल रे (2010-11) आणि स्पेनिश लीग (2011-12) मध्ये किताब मिळवण्यास मदत केली.