बंगळुरू : इंडियन प्रीमियर लीगच्या नव्या सीजनसाठी जगभरातील खेळाडूंवर आज बोली लागते आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुची टीम खूपच मजबूत दिसत आहे. विराट कोहली या टीमचा कर्णधार आहे. विराट शिवाय या टीममध्ये जगातील आणखी एक सर्वोत्कृष्ट खेळाडू एबी डिविलियर्स देखील आहे. पण या टीममध्ये आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे. ते म्हणजे मॅक्क्युलम. मॅक्क्युलमला आरसीबीने 3.6 कोटींना विकत घेतलं आहे.


मॅक्क्युलम याआधी गुजरात लायन्स मधून खेळत होता. न्यूझीलंडचा माजी कर्णधार आणि विकेटकीपर मॅक्क्युलम हा धडाकेबाज क्रिकेटर्सच्या यादीत येतो. बंगळुरुमध्ये त्याचा समावेश झाल्याने बंगळुरु संघ अजून मजबूत झाला आहे.