मुंबई : क्रिकेट सोबत ज्याचं नाव नेहमी घेतलं जाईल अशा सचिन तेंडुलकरचे अनेक फॅन्स भारतात आणि विदेशातही पाहायला मिळतात. अनेक क्रिकेटर्सने तर सचिनलाच आदर्श ठेवून क्रिकेटमध्ये करिअर केलं. अनेक दुसऱ्या देशातील खेळाडू देखील सचिनचे फॅन आहेत आणि ते सचिनला फॉलो करतात. 


ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज ब्रेट लीने नुकताच एक ट्विट करुन त्याला सचिनचा खरा फॅन सापडल्याचं म्हटलं आहे. त्याने त्या फॅनचा फोटो त्याच्या इन्स्टाग्रॅमवर शेअर केला आहे. सचिनने त्यावर प्रतिक्रिया देत फॅन्सचे आभार मानले आहेत.