दुबई: भारत टी 20 वर्ल्ड कपमध्ये सेमीफायनलच्या स्पर्धेतून बाहेर गेला आहे. यामध्ये आता चार संघांमध्ये चुरशीची लढत होणार आहे. या चुरशीच्या लढतीमध्ये पाकिस्तान संघ जिंकेल अशी भविष्यवाणी दिग्गज खेळाडूनं केली आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध पाकिस्तान आज सेमीफायनल सामना UAE मध्ये होत आहे. या सामन्याच्या पार्श्वभूमीवर दिग्गज खेळाडूनं ही भविष्यवाणी केली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंड संघाने इंग्लंड संघाला 5 विकेट्सने पराभूत करत फायनलमध्ये आपली जागा निश्चित केली आहे. त्यामुळे आता अंतिम सामन्यात कोणता संघ पोहोचणार याकडे सर्वांच्या नजरा आहेत. 14 नोव्हेंबर रोजी टी 20 वर्ल्ड कपचा फायनल सामना खेळवण्यात येणार आहे. या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 


ऑस्ट्रेलिया विरुद्ध होणाऱ्या सेमीफायनल सामन्यात पाकिस्तान संघाचा विजय होईल अशी भविष्यवाणी दिग्गज खेळाडू ब्रायन लारा याने केली आहे. त्याने ट्वीट करून आपलं मत सोशल मीडियावर मांडलं आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामन्यात पाकिस्तान यावेळी जिंकेल असा दावा त्याने केला आहे. या मागचं कारणही त्याने सांगितलं आहे.


T20 पाठोपाठ कसोटीचं कर्णधारपदही नाही, विराट ऐवजी या खेळाडूकडे धुरा?


यावेळी पाकिस्तानकडे केवळ उत्तम फलंदाजच नाही तर गोलंदाजही आहेत. त्यामुळे पूर्ण कौशल्य वापरून यावेळी पाकिस्तान संघ मैदानात उतरला आहे. याचाच वापर करून पाकिस्तान संघ ऑस्ट्रेलिया संघाला सेमीफायनलमध्ये पराभूत करू शकतो. पाकिस्तान संघ फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित करेल असा दावा ब्रायन लाराने केला आहे. 


ब्रायन लाराने याआधी केलेली न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंड संदर्भातील भविष्यवाणी खरी ठरली. त्याचं भाकीत खरं ठरल्याने आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर चर्चेला उधाण आलं आहे. टी-20 मध्ये पाकिस्तानचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा रेकॉर्ड चांगला आहे. दोन्ही देशांदरम्यान 23 टी-20 सामने झाले. त्यापैकी 13 पाकिस्तानने आणि 9 ऑस्ट्रेलियाने जिंकले आहेत.


या व्यक्तीकडून टीम इंडियातील खेळाडूंना SEX करण्याचा सल्ला, वक्तव्यामुळे सर्वत्र खळबळ