जयपूरमधील त्या होर्डिग्जबाबत बुमराहने व्यक्त केली नाराजी
जयप्रीत बुमराहच्या नो बॉलवरुन जयपूरमध्ये लावण्यात आलेले होर्डिंग्ज हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारी बुमराहने सोशल मीडियावर हे होर्डिंग्ज शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.
नवी दिल्ली : जयप्रीत बुमराहच्या नो बॉलवरुन जयपूरमध्ये लावण्यात आलेले होर्डिंग्ज हटवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शुक्रवारी बुमराहने सोशल मीडियावर हे होर्डिंग्ज शेअर करत नाराजी व्यक्त केली होती.
खरतरं, जयपूर पोलिसांनी बुमराहच्या नो बॉलवरुन सुरक्षेबाबतची नवी जाहिरात केली होती. बुमराहचा नो बॉल टाकत असल्याचा फोटो आणि त्याच्या बाजूला लाईन कधीही क्रॉस करु नका. हे तुमच्यासाठी महाग ठरु शकते, असा संदेश लिहिला होता.
यावर नाराजी व्यक्त करताना बुमराह म्हणाला, जयपूर वाहतूक पोलीस खूप छान, आपल्या देशासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तीला देशात किती आदर दिला जातो हे समजते. मी माझ्या चुकीला चेष्टेचा विषय बनू देणार नाही. कारण मला विश्वा आहे की माणूस नेहमी चुकीतूनच शिकतो.