IND vs AUS 2nd T20I : भारत आणि ऑस्ट्रेलिया टी-ट्वेंटी मालिकेतील दुसरा सामना आज नागपूरमध्ये खेळला जात आहे. पावसाअभावी सामना 8-8 ओव्हरचा करण्यात आला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने 90 धावा केल्या आहेत. (Bumrah's yorker was applauded by Finch Watch the video)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलियाकडून सलामीसाठी आलेल्या एरॉन फिंचने तुफान फटकेबाजी करत ऑस्ट्रेलियाला चांगली सुरूवात करून दिली. भारताकडून अक्षर पटेलने फिरकीची कमाल दाखवत सुरूवातीला झटपट 3 विकेट मिळवून दिल्या. 


एकीकडे फिंच एक बाजू सांभाळून खेळत असताना रोहित शर्माने बुमराहकडे बॉल सोपवला. पाचवी ओव्हर घेऊन आलेल्या बुमराहने घातक यॉर्करचा मारा केला. पाचव्या ओव्हरच्या अखेरच्या चेंडूवर बुमराहने परफेक्ट यॉर्कर टाकून फिंचचा बोल्ड काढला.


बुमराहच्या घातक यॉर्करला फिंचकडून दाद मिळाली. टाळ्या वाजवून फिंचने बुमराहचं कौतुक केलं आहे. त्याचबरोबर बुमराहच्या आणखी एका यॉर्करवर स्टिव्हन स्मिथ देखील खाली पडल्याचं पहायला मिळालं आहे. बुमराहने 2 ओव्हरमध्ये 23 धावा देत 1 विकेट नावावर केलाय.


पाहा व्हिडीओ-