क्रिकेटच्या मैदानात घडलं असं काही की प्रेक्षकांंमध्ये पसरली शांतता
ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये काही असं घडलं ज्यामुळे मैदानावरील प्रत्येकाच्याच मनात धडकी भरली असेल.
मुंबई : ऑस्ट्रेलियातील बिग बॅश लीगमध्ये काही असं घडलं ज्यामुळे मैदानावरील प्रत्येकाच्याच मनात धडकी भरली असेल.
सिडनी थंडरच्या बाजूने जोस बटलर किपिंग करत होता. बॉल अर्जुन नायरच्या हातात होता. सॅम बिलिंगने लेग साईटला शॉट खेळला आणि दोन रन घेण्यासाठी धावला. लेग साईडला फिल्डिंग करणाऱ्या खेळाडूने वेगाने बॉल थ्रो केला.
बॉलने जमिनीवर टप्प्या खाल्यानंतर बाऊन्स झाला आणि तो सरळ बटलरच्या डोक्यावर येऊन आदळला. या घटनेनंतर संपूर्ण मैदानावर एकच शांतता पसरली. बटलरने किपिंग करताना हेल्मेट घातले होते पण तरी बॉलचा फटका त्याला लागला. त्यानंतर लगेचच मैदानावर डॉक्टरांना डॉक्टरांना बोलवण्यात आलं.
पाहा व्हिडिओ
सिडनी थंडर विरुद्ध प्रथम फलंदाजी करताना सिडनी सिक्सर्सने 20 ओव्हरमध्ये 149 धावा केल्या. सिडनी थंडरकडून शेट वॉटसनने 46 चेंडूंमध्ये 77 धावा केल्या. पण जेव्हा तो आऊट झाला तेव्हा थंडर्सची परिस्थिती बिघडली. वॉटसनने आपल्या डावाच 6 सिक्स आणि 6 फोर लगावले. सिडनी थडर्सला शेवट्या २ बॉलमध्ये २ रन पाहिजे होते. सिडनी थंडर्सने नंतर सहज विजय मिळवला.