मुंबई : टीम इंडियाच्या बांगलादेश दौऱ्याची (India vs Bangladesh) सुरुवात 4 डिसेंबरपासून होतेय. या दौऱ्याआधी बीसीसीआयने (Bcci) मोठा निर्णय घेतलाय. बीसीसीआयने गुरुवारी सल्लागार समितीची (Advisory Committee) नियुक्ती केली आहे. या सल्लागार समितीत 3 दिग्गजांचा समावेश करण्यात आला आहे. (cac bcci appointed to advisory committee ashok malhotra jatin paranjape and sulakshan naik)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बीसीसीआयने सल्लागार समितीत अशोक मल्होत्रा, जतिन परांजपे आणि सुलक्षणा नायक यांचा समावेश केला आहे.  मल्होत्रा यांनी टीम इंडियाचं 7 कसोटी आणि 20 एकदिवसीय सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केलंय. मल्होत्रा याआधी इंडियन क्रिकेटर्स असोसिएशनचे अध्यक्षही राहिले आहेत.  परांजपे यांनीही 4 एकदिवसीय सामने खेळले आहेत. परांजपे एमएसके प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली सिनिअर मेन्स निवड समितीचे सदस्य होते. तर सुलक्षणा यांनी भारतासाठी 2 कसोटी, 46 एकदिवसीय आणि 31 टी 20 सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलंय. तसेच सुलक्षणा या मागील त्रिसदस्यीय सल्लागार समितीच्या सदस्य होत्या. तर उर्वरित 2 सदस्यांमध्ये मदन लाल आणि आरपीस सिंह होते. 


सल्लागार समितीची पहिली जबाबदारी ही 5 सदसय्यी सिनिअर मेन्स निवड समितीच्या सदस्यांची निवड करणं असणार आहे. बीसीसीआयने 18 नोव्हेंबरला विविध पदांसाठी भरती काढली होती. या पदांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख ही 28 नोव्हेंबर होती. तसेच 60 पेक्षा अधिक जणांनी निवड समितीसाठी अर्ज केला. 


टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये इंग्लंडकडून पराभव स्वीकारावा लागला. यानंतर निवड समिती बरखास्त करण्यात आली. चेतन शर्मा या निवड समितीचे अध्यक्ष होते. यात हरविंदर सिंह यांचा समावेश होता.  मात्र पराभवानंतर ही समिती बरखास्त करण्यात आली. दरम्यान यानंतरही चेतन शर्मा यांनी हरविंदर या दोघांनी पुन्हा एकदा अर्ज केलाय.