मेलबर्न : इंग्लंडविरोधात खेळल्या जाणाऱ्या वन-डे सीरिजसाठी ऑस्ट्रेलियन टीममध्ये केमरुन व्हाईटची वर्णी लागली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऑस्ट्रेलिया क्रिकेट (सीए)ने गुरुवारी या वन-डे सीरिजची घोषणा केली. ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात पाच वन-डे मॅचेसची सीरिज खेळली जाणार आहे. 


व्हाईटने गेल्या तीन वर्षांपासून वन-डे क्रिकेट खेळलं नाहीये. स्थानिक क्रिकेट आणि बिग बॅश लीगमध्ये केलेल्या दमदार प्रदर्शनामुळे ३४ वर्षीय व्हाईटची टीममध्ये वर्णी लागली आहे. 


ऑस्ट्रेलिया क्रिकेटची निवड करणाऱ्या टीममधील ट्रेवर हॉन्स यांनी सांगितले की, व्हाईट चांगल्या फॉर्मात आहे आणि आकडे याचा पुरावा आहे. तो खूपच चांगला खेळत आहे. बीबीएलमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या प्लेअर्समध्ये त्याचं नाव आहे. यासोबतच तो एक अनुभवी प्लेअर आहे.


क्रिकेट डॉट कॉम डॉट एयू या वेबसाईटच्या रिपोर्टनुसार, टीममध्ये निवड झाल्याने व्हाईट खूपच आनंदी आहे. त्याने प्रतिक्रिया देत म्हटलं की, माझी निवड झाल्याचं कळताच मला आश्चर्य वाटलं आणि खुषही झालो. निश्चितच मी या संधीची वाट पाहत होतो.