Rohit Sharma: कर्णधार मी आहे...; शमी-राहुलच्या `या` गोष्टीवरून भर मैदानात संतापला रोहित शर्मा
Rohit Sharma: या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.यावेळी रोहित शर्मा मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि केएल राहुल (KL Rahul) संतापला होता.
Rohit Sharma: वर्ल्ड कप 2023 (World Cup 2023) मध्ये टीम इंडियाची घौडदौड सुरुच आहेत. आतापर्यंत वर्ल्डकपमध्ये टीम इंडियाला एकाही पराभवाला सामोरं जावं लागलेलं नाही. टीम इंडियाने आतापर्यंत 8 सामने खेळले असून सर्व सामन्यांमध्ये टीमला विजय मिळवणं शक्य झालं. दरम्यान रविवारी दक्षिण आफ्रिकेसारख्या बलाढ्य टीमला देखील टीम इंडियाने लोळवलं. मात्र यावेळी कर्णधार रोहित शर्मा मोहम्मद शमी आणि के.एल राहुलवर संतापलेला दिसला. नेमकं प्रकरण काय घडलं ते पाहूयात.
या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या निर्णय टीम इंडियासाठी खूपच फायदेशीर ठरलेला दिसला. टीम इंडियाने यावेळी 326 रन्सची खेळी केली. याच्या प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेची टीम अवघ्या 83 रन्समध्ये ऑल आऊट झाली. मात्र यावेळी रोहित शर्मा मोहम्मद शमी (Mohammed Shami) आणि केएल राहुल (KL Rahul) संतापला होता.
या गोष्टीवरून भर मैदानात संतापला रोहित शर्मा
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळल्या जात असलेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज व्हॅन डेर डुसेनने मोहम्मद शमीच्या ओव्हरमध्ये शॉट मारला. यावेळी बॉल त्याच्या पॅडला लागला. यानंतर भारतीय टीमचा विकेटकीपर फलंदाज केएल राहुल आणि गोलंदाज मोहम्मद शमी यांनी अपील केलं. यावेळी रोहित शर्माला न विचारताच त्यांनी अंपायरकडे लगेच रिव्ह्यू मागितला.
यावेळी रोहित शर्माच्या बॉडी लँग्वेजवरून असं दिसत होतं की, के.एल राहुल आणि मोहम्मद शमीची ही गोष्ट रोहित शर्माला आवडलेली नाही. मात्र अखेरीस हा रिव्ह्यू घेणं यशस्वी ठरला. यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या टीमला एक विकेट गमवावी लागली.
टीम इंडियाचा मोठा विजय
कोलकता ईडन गार्डन्सवर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला होता. रोहित आणि शुभमन गिलने दमदार सुरूवात करून दिली. सहाव्या ओव्हरमध्ये रोहित तर 11 व्या ओव्हरमध्ये शुभमन गिल यांची विकेट गमावली. श्रेयस अय्यर आणि विराटने साऊथ अफ्रिकेच्या गोलंदाजांवर आक्रमण सुरू केलं. अय्यरने 77 धावांची विराट खेळी केली. मात्र, विराटने शतक ठकलं. जडेजाने 15 बॉलमध्ये 29 रन्सची वादळी खेळी केली आणि टीम इंडियाला 326 रन्सवर पोहोचवलं.
भारतासमोर 327 रन्सच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेला दक्षिण आफ्रिकेचा टीम भारतीय गोलंदाजांसमोर पूर्णपणे फ्लॉप ठरली. दक्षिण आफ्रिका 27.1 ओव्हर्समध्ये केवळ 83 रन्सवर गारद झाली. भारताकडून रवींद्र जडेजाने 5, मोहम्मद शमी आणि कुलदीप यादवने प्रत्येकी 2 आणि सिराजने 1 विकेट घेतला. टीम इंडियाने अखेरीस हा सामना 243 रन्सने जिंकला.