Indian Captain in T20 World Cup-2024 : वनडे वर्ल्डकपनंतर आता टी-20 वर्ल्डकप खेळवला जाणार आहे. शुक्रवारी म्हणजेच 5 जानेवारी रोजी आयसीसीने वर्ल्डकपच्या शेड्यूलची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यापूर्वी टीम इंडियाच्या चाहत्यांना भारताचा कर्णधार कोण असणार असा प्रश्न अधिक सतावतोय. अशातच आयसीसीने लॉंच केलेल्या पोस्टरनंतर आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये टीमची धुरा कोणाच्या हाती असणार आहे, याचा अंदाज मात्र चाहत्यांनी बांधलाय. 


रोहित शर्मा करणार कॅप्टन्सी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयसीसीने टी-20 जारी केलेल्या पोस्टरमध्ये भारतीय टीमच्या जर्सीमध्ये फक्त रोहित शर्मा दिसतोय. यावरून काही चाहत्यांनी टी-20 वर्ल्ड कपमध्ये रोहित टीम इंडियाचे कर्णधारपद सांभाळेल, असा अंदाज बांधलाय. दरम्यान याबाबत अजून अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हाती आलेल्या एका अहवालही समोर आला होता ज्यामध्ये रोहित आणि विराट कोहली यांनी टी-20 वर्ल्डकपसाठी स्वत:ला उपलब्ध असल्याचे घोषित केलं होतं. टी-20 वर्ल्डकपमध्ये हार्दिक पांड्याकडे भारताचे कर्णधारपद सोपवलं जाऊ शकतं, अशीही शक्यता मानली जातेय. 



पाकिस्तानची कमान शाहीन आफ्रीदीकडे


आयसीसीने लॉंच केलेल्या पोस्टमध्ये वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी पाकिस्तानच्या जर्सीत दिसतोय. यावरून शाहीनच पाकिस्तान टीमचा कर्णधार असेल हे स्पष्ट होतंय. वनडे वर्ल्डकप 2023 नंतर बाबर आझमने सर्व फॉरमॅटचे कर्णधारपद सोडलं. त्यानंतर शाहीनकडे टी-20 क्रिकेटचं कर्णधारपद देण्यात आले. याशिवाय जॉस बटलर इंग्लंडचा कर्णधार आणि रोव्हमन पॉवेलकडे वेस्ट इंडिजचा कर्णधार असल्याचं समजतंय.


1 जूनपासून होणार वर्ल्डकपला सुरुवात


टी-20 वर्ल्डकपची सुरुवात 1 जूनपासून सुरुवात होणार आहे. अमेरिका आणि कॅनाडादरम्यानच्या सामन्याने या वर्ल्डकपला स्पर्धेला सुरुवात होईल. ग्रुप स्टेजमधले सर्व सामने 1 ते 18 जूनदरम्यान होतील. त्यानंतर सुपर 8 चे सामने 19 ते 24 जूनदरम्यान खेळवले जातील. अंतिम सामना 29 जून रोजी खेळवला जाणार आहे. या वर्ल्डकपमध्ये भारतीय क्रिकेट संघाचा पहिला सामना 5 जूनला आयर्लंडविरुद्ध होणार आहे. 


टी-20 वर्ल्डकपसाठी संभाव्य प्लेईंग 11


रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जायसवाल, ईशान किशन, विराट कोहली, तिलक वर्मा, रिंकू सिंह, संजू सॅमसन, जितेश शर्मा, हार्दिक पंड्या, वॉशिंगटन सुंदर, अक्षर पटेल, शिवम दुबे, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंह, प्रसिद्ध, आवेश खान, मुकेश कुमार