मुंबई : दक्षिण आफ्रिकेनंतर आता टीम इंडिया वेस्ट इंडियविरूद्ध सीरीज खेळणार आहे. या सीरीजसाठी भारताचा कर्णधार रोहित शर्मा पूर्णपणे फीट आहे. येत्या 6 फेब्रुवारीपासून अहमदाबाद तीन सामन्यांची वनडे सीरीज सुरु होणार असून रोहित कर्णधारपद भूषवणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वनडे सीरीजनंतर भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तीन सामन्यांची टी-20 मालिकाही खेळवली जाणारे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेतील 0-3 वनडे सीरीजमध्ये क्लीन स्वीप मिळाल्यानंतर काही खेळाडूंना टीममधून डच्चू मिळण्याची शक्यता आहे.


आज होणार वनडे टीमची घोषणा


फीटनेसच्या कारणामुळे दक्षिण आफ्रिका दौऱ्यातून बाहेर असलेला रोहित नेतृत्व करण्यास तयार आहे आहे. रोहित बुधवारी सकाळी 11.30 वाजता फिटनेस चाचणी टेस्ट देईल आणि त्यानंतर टीमची घोषणा केली जाईल. 


16 ते 20 फेब्रुवारी दरम्यान कोलकातामध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध तीन टी-20 सामने खेळवले जाणार आहेत. बीसीसीआयच्या एका सूत्राने सांगितलं की, “रोहित फीट असून आणि वेस्ट इंडिजविरुद्ध खेळणार आहे.


या खेळाडूंना मिळणार डच्चू?


भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह इंडिया टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. मात्र या सहा सामन्यांमधून त्याला विश्रांती दिली जाण्याची शक्यता आहे. दुसरी अत्यंत खराब फॉर्ममध्ये असलेल्या भुवनेश्वर कुमार आणि आर अश्विन यांनी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वनडे सीरीजनंतर त्यांना टीममधून वगळलं जाऊ शकतं. त्याच्या जागी आवेश खान आणि हर्षल पटेल या वेगवान गोलंदाजांना पुन्हा एकदा टी-20 टीममध्ये स्थान मिळू शकतं.


रविंद्र जडेजा पुनरागमन करणार?


फीटनेसच्या कारणामुळे रविंद्र जडेजा टीमबाहेर गेला होता. यानंतर आता तो वेस्टइंडिज दौऱ्यावर टीममध्ये पुनरागमन करण्याची शक्यता आहे. जर वेस्टइंडिजच्या दौऱ्यावर तो पुनरागमन करू शकला नाही तर श्रीलंकेच्या दौऱ्यावर त्याचं नक्की पुनरागमन होईल.