Rohit Sharma Statement: मंगळवारी टीम इंडियाने ( Team India ) श्रीलंकेला नमवून जवळपास फायनलचं तिकीट निश्चित केलं आहे. टीम इंडिया 11 व्यांदा एशिया कपच्या फायनलमध्ये खेळणार आहे. फायनल गाठल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) फार खूश असल्याचं दिसून आलं. यावेळी मैदानावर रोहित शर्मा त्याचे इमोशंस लपवू शकला नाही. आता 17 सप्टेंबर रोज एशिया कपची ( Asia Cup 2023 ) फायनल रंगणार आहे. यावेळी टीम इंडियाचा सामना पाकिस्तान किंवा श्रीलंकेशी होणार आहे. 


फायनल गाठल्याने रोहित शर्मा खूश


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एशिया कपच्या ( Asia Cup 2023 ) अंतिम फेरीत पोहोचल्यानंतर कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) पोस्ट प्रेझेंटेशनमध्ये मोठं विधान केलंय. यावेळी रोहितने एका खेळाडूला टीम इंडियाच्या विजयाचा सर्वात मोठा हिरो मानलंय. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ( Rohit Sharma ) या सामन्यानंतर म्हणाला, 'हा एक चांगला सामना होता. अशा आव्हानात्मक खेळपट्टीवर दबावाखाली खेळणं आमच्यासाठी खूप महत्त्वाचं होते. आम्हाला अशाच खेळपट्ट्यांवर खेळायला आवडेल. पुढच्या सामन्यांमध्ये आम्ही काय साध्य करू शकतो हे पाहण्यासाठी आम्हाला अशाच खेळपट्ट्यांवर खेळायचंय.


रोहितने 'या' खेळाडूला दिलं विजयाचं श्रेय


रोहित शर्मा ( Rohit Sharma ) म्हणाला, 'हार्दिक पांड्याने गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्या गोलंदाजीवर खूप मेहनत घेतलीये. हे यश एका रात्रीत मिळत नाही. हे पाहून आनंद होतो. प्रत्येक बॉलवर हार्दिक पांड्या विकेट घेतोय असं वाटत होतं. आम्हाला सातत्याने चांगली गोलंदाजी करायची होती आणि मला वाटतं की, आम्ही चांगली कामगिरी केली आहे. 


कुलदीप यादवबद्दल बोलताना रोहित ( Rohit Sharma ) म्हणाला, 'कुलदीप यादवने गेल्या वर्षभरात चांगली गोलंदाजी केलीये. कुलदीप यादवने लयीत येण्यासाठी खूप मेहनत घेतलीये. कुलदीप यादवने पुन्हा ड्रॉईंग बोर्डवर जाऊन काम केलंय. 


टीम इंडियाचा श्रीलंकेवर विजय


टॉस जिंकून पहिली फलंदाजी करणारी टीम इंडिया 213 रन्सवर ऑलआऊट झाली. पण विजयाचं हे माफक आव्हानही श्रीलंकेला पेलवता आलं नाही. यावेळी गतविजेती श्रीलंका 172 रन्सवर गारद झाली. भारताच्या गोलंदाजीचा हिरो ठरतो तो चायनामन कुलदीप यादव. पाकिस्तानविरुद्ध 5 विकेट घेणाऱ्या कुलदीपने श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात 4 विकेट घेतल्या. बुमराह आणि जडेजाने प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. दुसरीकडे कर्णधार रोहित शर्माने ( Rohit Sharma ) 48 धावात 53 धावा केल्या, पण त्याच्याव्यतिरिक्त एकाही भारतीय फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.