मुंबई : रोहित शर्माला कोरोना झाल्याने तो सध्या आयसोलेशनमध्ये आहे. तो इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात खेळताना दिसणार नाही अशी चर्चा आहे. तर पाचव्या कसोटी सामन्यासाठी टीमचं नेतृत्व जसप्रीत बुमराहकडे देण्यात आलं आहे. मिळालेल्या माहितीनुसर रोहित शर्मा मैदानात परतणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

टीम इंडियाला इंग्लंड विरुद्ध तीन टी 20 मॅच खेळायच्या आहेत. तर तीन वन डे सामनेही खेळायचे आहेत. या सामन्याआधी कॅप्टन रोहित शर्मा फिट होऊन मैदानात खेळताना दिसेल अशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे क्रिकेटप्रेमींचा उत्साह वाढला आहे. 


इंग्लंड विरुद्ध पाचव्या कसोटी सामन्यात खेळणाऱ्यांना पहिल्या टी 20 सामन्यासाठी आराम देण्यात येणार आहे. त्यामुळे पहिल्या टी 20 सामन्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये कोणाला संधी मिळणार याची उत्सुकता असणार आहे.


इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी 20 सामन्यासाठी विराट कोहली, ऋषभ पंत, जसप्रीत बुमराह, श्रेयस अय्यर आणि रवींद्र जडेजा टीम इंडियाकडून खेळताना दिसतील. याशिवाय भारताचा सलामीवीर शिखर धवन आणि ऑलराऊंडर हार्दिक पांड्या इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी खेळताना दिसणार आहेत अशी माहिती मिळाली आहे.


के एल राहुल मात्र दुखापतीमुळे इंग्लंड सीरिजमधून बाहेर झाला आहे. त्याच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तो लवकरच मैदानात खेळताना दिसावा यासाठी चाहते आतूरतेनं वाट पाहात आहेत. तो लवकर बरा व्हावा म्हणून प्रार्थनाही करत आहेत.