मुंबई : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिल्याच T20 सामन्यात टीम इंडियाने दमदार सुरुवात केली आणि इंग्लंडचा 50 रन्सने पराभव करत विजय मिळवला. पहिला सामना जिंकून भारताने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतलीये. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारताचा इंग्लंडविरुद्धचा हा मोठा विजय होता, त्यामुळे कर्णधार हिटमॅनही खूप आनंदी दिसत होता. पण, तो फिल्डींगबाबत तो चांगलाच संतापलेला दिसला.


मैदानावर आम्ही खूप सुस्त होतो


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहिल्या T20 सामन्यात भारताने एक नाही तर अनेक कॅच सोडले. ज्याचा टीमच्या विजयावर काहीही परिणाम झाला नाही. पण, हे झेल काही वेळा पराभवाचे कारण बनतात. यामुळेच टीम इंडियाच्या खेळाडूंनी याकडे लक्ष द्यावं अशी हिटमॅनची इच्छा आहे. 


याबद्दल बोलताना तो (रोहित शर्मा) म्हणाला, “आम्हाला फलंदाजी करायची होती. कधी कधी लाईटच्या खाली खेळताना बॉल स्विंग होतो. दोन्ही नवीन बॉल गोलंदाजांनी स्विंगचा वापर करून फलंदाजांना रोखले. आम्ही मैदानावर सुस्त होतो. ते कॅच घ्यायला हवे होते. मला खात्री आहे की, येत्या सामन्यांमध्ये आम्ही खूप चांगली फिल्डींग करू.”


विराट कोहलीलाही टाकलं मागे


या सामन्यात रोहित शर्माने 14 बॉलमध्ये 5 चौकारांच्या मदतीने 24 रन्स केले. या खेळीच्या मदतीने रोहित टी-20 क्रिकेटमध्ये सर्वात जलद 1000 धावा करणारा भारतीय कर्णधार बनला आहे. त्याने यामध्ये माजी कर्णधार विराट कोहलीला मागे टाकलंय. कोहलीने 30 डावात हा पराक्रम केला, मात्र रोहित शर्माने 29 डावांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार केला आहे.