Carlos Alcaraz Net Worth 2024: लंडनच्या सेंटर कोर्टवर रविवारी नोव्हाक जोकोविचचे 8 वं विम्बल्डन विजेतेपद हुकलं. युवा स्टार खेळाडू कार्लोस अल्काराझने विम्बल्डन 2024 पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत जोकोविचचा 6-2, 6-2, 7-6 (7-4) असा पराभव केला. यासह कार्लोस अल्काराझने दुसऱ्यांदा विम्बल्डनचे विजेतेपद पटकावलं. विम्बल्डन 2024 मधील पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीतील (Wimbledon 2024 prize money) विजेत्याला म्हणजेच कार्लोस अल्काराझला 3,427,396 पौंड (28 कोटी 35 लाख रुपये) मिळतील. तर उपविजेता नोव्हाक जोकोविचला 1,400,000 पौंड (14 कोटी 70 लाख रुपये) मिळतील. पण तुम्हाला कार्लोस अल्कराझची एकूण नेटवर्थ किती? तुम्हाला माहितीये का?


कार्लोस अल्कराझची नेटवर्थ किती? (Carlos Alcaraz Net Worth)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही विदेशी मीडिया रिपोर्टनुसार, 2024 पर्यंत कार्लोस अल्काराझची अंदाजे निव्वळ संपत्ती 15 दशलक्ष अमेरिकन डॉलर (1,25,27,90,250 रुपये) इतकी आहे. त्याहून अधिक जास्त असण्याची देखील शक्यता आहे. स्पॅनिश टेनिसपटू कार्लोस 2018 मध्ये व्यावसायिक पातळीवर खेळायला लागला. त्यानंतर त्याने अनेक ब्रँडसाठी काम केलं. यामध्ये रोलेक्स, अल्पोझो, बीएमडब्ल्यू, केल्विन क्लेन, लुई व्हिटॉन आणि आयएसडीआयएन यांचा समावेश आहे.


कार्लोस अल्काराज स्पेनमधील एल पालमार येथं राहतो. तिथं त्याचं आलिशानघर आहे. SUV BMW iX1 व्यतिरिक्त, कार्लोस अल्काराजकडे इतर महागड्या कार देखील आहेत. कार्लोस अल्काराजच्या संपत्तीविषयी अधिकची माहिती उपलब्ध नाही. मागील वर्षी विम्बल्डनमध्ये चॅम्पियन बनताच अल्काराझवर पैशांचा वर्षाव झाला. 20 वर्षीय अल्काराजला विम्बल्डन जिंकण्यानंतर 23 लाख 50 हजार पौंडची बक्षीस रक्कम मिळाली होती.



दरम्यान, फोर्ब्स मासिकाच्या अहवालानुसार अल्काराजची एकूण संपत्ती 100 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. अल्काराझच्या उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत टेनिस स्पर्धांमधून मिळणारी बक्षीस रक्कम आहे. तर जाहिरीतीच्या माध्यमातून देखील त्याला बक्कळ पैसे मिळतात. कार्लोस अल्काराजची फॅनफोलोविंग देखील भरपूर आहे. अनेक ठिकाणी त्याचं कौतूक होतं.