नवी दिल्ली : WWEम्हटले का आव्हान प्रतिआव्हान हे आलेच. रिसलमेनीया-३४च्या निमित्ताने ही आव्हाने प्रितआव्हाने पुन्हा एकदा पुढे आली आहेत. ८ एप्रिलपासून (भारतात ९ एप्रिल) सुरू होणाऱ्या रेसलमेनीया ३४ मध्ये WWE चाहत्यांना रोमांचकारी क्षणांची अनुभुती घेता येणार आहे. कारण, या वेळीही नेहमीप्रमाणेच स्टार रेसलर आमने-सामने असणार आहेत. यात जॉन सीना, अंडरटेकर, ब्रोक लेस्नर, रोमन्स रेंज, स्ट्रमॅन यांसारख्या दिग्गजांचा समावेश आहे. दरम्यान, रेसलमेनिया ३४ पुर्वी रेसलर्स एकमेकांना चिथावत असून, त्याचे व्हिडिओही व्हायरल होत आहेत. याचाच एक भाग म्हणून जॉन सीना गेली काही दिवस अंडरटेकरला चिथावणी देत आहे. अंडरटेकरने सीनाचे आव्हान स्विकारले आहे. मात्र, केनविरूद्ध झालेल्या एका झटापटीतही सीनाने अंडरटेकरची स्टाईल मारत खिल्ली उडवली. हा व्हिडिओही प्रचंड व्हायरल होत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान, या आठवड्यातील रॉमध्ये अंडरटेकर आणि सीना समोरासमोर येतील. दरम्यान, त्याआधीच प्रेक्षकांना सीना विरूद्ध केन असा सामना पहायला मिळाला. या सामन्यात सीना केनवर भारी पडला. पण, खरी मजा तर तेव्हाच आली जेव्हा सीनाने अंडरटेकरची स्टाईल मारली. सीना, अंडरटेकरच्या स्टाईलसमध्ये रिंगमध्ये उभा राहिला आणि त्याने फिनिशची स्टाईल केली. इतकेच नव्हे तर, त्याने चोक्स्लॅमही मारला. या स्टाईलनंतर अंडरटेकर बाहेर येईल असा अंदाज होता. मात्र, तसे घडले नाही. मग, सीनाने आपल्या खास स्टाईलने केनला पराभूत केले आणि सामना खिशात टाकला.



दरम्यान, या सामन्यानंतर सीनाने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक मीम(MEM) शेअर केला. ज्यावर लिहीले होते "C'mon Do Something।".