मुंबई : श्रीलंकेचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू चमारा सिल्वावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. मॅच फिक्सिंगप्रकरणी दोषी आढळल्यामुळे चमारा सिल्वावर ही कारवाई करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये मॅच फिक्सिंग केल्यामुळे चमारा सिल्वावर दोन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे. या वर्षी जानेवारी महिन्यामध्ये श्रीलंकेमधल्या दोन क्लबमध्ये ही मॅच झाली होती. १९९९ ते २०११मध्ये चमारा सिल्वा श्रीलंकेसाठी ११ टेस्ट, ७५ वनडे आणि १६ टी-20 खेळला आहे.