Chamika Karunaratne Wicket: भारत आणि श्रीलंका (IND vs SL 3rd ODI) यांच्यात खेळल्या गेलेल्या तिसरा सामन्यात टीम इंडियाने (Historic win by Team India) ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. त्याचबरोबर भारताने श्रीलंकेला क्लीन स्विप दिलाय. त्यामुळे आता भारताच्या डगआऊटमध्ये आनंदाचं वातावरण पहायला मिळत आहे. आशिया कप (Asia cup) जिंकणाऱ्या टीमला चीतपट करत भारताने आगामी वर्ल्ड कपवर (ODI World Cup 2023) दावेदारी ठोकली आहे. अशातच आजच्या सामन्यातील चमिका करूणारत्नेची विकेट पाहण्याजोगी होती. (Chamika Karunaratne Wicket on Mohammed Siraj throw in IND vs SL 3rd ODI marathi news)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सामन्याची 12 वी ओव्हर करण्यासाठी सिराजच्या (Mohammed Siraj) हातात बॉल सोपावण्यात आला. तोपर्यंत सिराजच्या भेदक गोलंदाजीचा सामना करताना श्रीलंकेने 5 गडी गमावले होते. या 12 व्या ओव्हरच्या चौथ्या चेंडूचा सामना श्रीलंकेचा चमिका करूणारत्ने (Chamika Karunaratne) करत होता. त्यावेळी सिराजने टाकलेला बॉल प्लेस करण्याचा प्रयत्न चमिकाने केला. मात्र, त्याला बॉल खेळायचा जमला नाही. 


आणखी वाचा - IND vs SL 3rd ODI: LIVE सामन्यात धक्कादायक घटना; श्रीलंकेचे 2 खेळाडू बेक्कार धडकले, स्ट्रेचरसहित डॉक्टर मैदानावर!


चमिकाने खेळलेला बॉल सिराजच्या हातात गवसला, त्यावेळी सिराजने बॉल स्टंप्सच्या दिशेने थ्रो (Mohammed Siraj Throw) केला. तोपर्यंत चमिका क्रीझच्या थोडा पुढे आला होता. सिराजच्या या थ्रोमुळे स्टंप्सच्या (Wicket) बेल्स उडाल्या आणि चमिका बाद झाला. त्यावेळी (Chamika Karunaratne Wicket) तो आऊट की नॉट आऊट?, असा सवाल विचारला जात होता. 


पाहा Video - 



दरम्यान, खूप वेळ गेल्यानंतर थर्ड अंपायरने (Third Umpire) चमिकाला बाद झाल्याचा निर्णय कळवला. त्यानंतर टीम इंडियाच्या आनंदाचा वाट उरली नव्हती. मोहम्मद सिराज (Mohammed Siraj), विराट कोहली (Virat Kohli) आणि रोहित शर्माच्या (Rohit Sharma) चेहऱ्यावरचं हास्य पाहण्याजोगं होतं. शेवटचं वृत्त हाती आलं, त्यावेळी भारताने श्रीलंकेचा (IND vs SL) धुव्वा उडवला. त्यामुळे टीम इंडियासाठी हा ऐतिहासिक विजय ठरणार आहे.