व्हायरल : बांग्लादेशी क्रिकेटफॅन्सकडून भारतीय तिरंग्याचा अपमान
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांग्लादेश आमने-सामने येणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी बांग्लादेशनं पुन्हा एकदा आपला `डर्टी गेम` खेळणं सुरू केलंय.
नवी दिल्ली : चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये भारत आणि बांग्लादेश आमने-सामने येणार आहे. परंतु, या सामन्यापूर्वी बांग्लादेशनं पुन्हा एकदा आपला 'डर्टी गेम' खेळणं सुरू केलंय.
भारताच्या तिंरग्याचा बांग्लादेशी फॅन्सकडून अपमान करण्यात आलाय. बांग्लादेशच्या ढाका आणि मीरपूरच्या जवळच्या भागांतील एक वादग्रस्त फोटो सध्या व्हायरल होताना दिसतोय. या फोटोत एक वाघ आणि एक कुत्रा एकमेकांवर हल्ला करण्याच्या तयारीत आहेत. कुत्र्यावर भारत आणि वाघावर बांग्लादेशचा झेंडा चिपकावण्यात आलाय.
धोनीचं कापलेलं शीर...
अशी हरकत करण्याची ही काही बांग्लादेशची पहिलीच वेळ नाही... याआधी मार्च २०१६ मध्ये आशिया कपदरम्यान, असाच एक फोट बांग्लादेशात व्हायरल झाला होता.
या फोटोत बांग्लादेशी बॉलर तश्कीन अहमदच्या हातात महेंद्रसिंग धोनीचं कापलेलं शीर दाखवण्यात आलं होतं.
उल्लेखनीय म्हणजे, चॅम्पियन्स ट्रॉफीच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडिया साऊथ आफ्रिकेला पछाडून दाखल झालीय. तर दुसरीकडे बांग्लादेशला मात्र केवळ 'लक' म्हणून सेमीफायनलमध्ये जागा मिळालीय.