मुंबई : चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ च्या दुसऱ्या सेमीफायनलमध्ये पहिल्या टुर्नामेंटला सर्वात जास्त रन्स करणारा बॅटसमनच्या लिस्टमध्ये रोहित शर्मा शिखर धवननंतर दुसऱ्या स्थानावर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ मध्ये आतापर्यंत रोहितने ३०४ रन्स केले आहेत, तर शिखर धवननने ३१७. आजच्या सामन्यात सर्वात जास्त रन्स करणाऱ्यांमध्ये रोहितच नावही होतं, मात्र या सामन्यात रोहित असं काही खेळला की या पाच खेळाडूंमध्ये तो आता दुसऱ्या नंबरवर आला आहे. 


पहिल्या क्रमांकावर शिखर धवन आहे, जर फायनलाल रोहितने शिखरपेक्षा जास्त रन्स केले, तर तो रेकॉर्ड रोहितच्या नावावर जाऊ शकतो. यावरून एक मात्र निश्चित आहे की चॅम्पियन्स २०१७ च्या ट्रॉफीत सर्वात जास्त रन्स करण्याचा रेकॉर्ड भारतीयाच्याच नावावर होणार आहे, आणि भारतीय खेळाडूंमध्येच ही स्पर्धा आहे.