हैदराबाद : क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर भारतीय महिला टीमवर बक्षिसांचा वर्षाव होत आहे. मंगळवारी भारतीय संघाची कॅप्टन मिताली राजला तेलंगणा बॅडमिंटन संघाचे उपाध्यक्ष व्ही. चामुंडेश्लवरनाथ यांनी बीएमडब्ल्यू गाडी बक्षीस म्हणून दिली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चामुंडेश्लवरनाथ यांचं खेळावर आधीपासूनच प्रेम आहे. चामुंडेश्लवरनाथ स्वत: आंध्र प्रदेशकडून रणजी क्रिकेट खेळले आहेत. आंध्र प्रदेशच्या टीमचे ते कॅप्टनही होते. चामुंडेश्लवरनाथ आता व्यावसायिक आहेत. मिताली राजला बीएमडब्ल्यू द्यायची घोषणा त्यांनी वर्ल्ड कप सुरु असतानाच केली होती.


याआधी २००७ साली चामुंडेश्लवरनाथ यांनी मिताली राजला शेवरले कार गिफ्ट दिली होती. मितालीबरोबरच त्यांनी पी.व्ही.सिंधू, साक्षी मलिक यांना ऑलिम्पिक मेडल जिंकल्याबद्दल आणि दीपा करमाकरला ऑलिम्पिकमध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल कार गिफ्ट दिली होती.


वर्ल्ड कपच्या फायनलपर्यंत भारतीय संघानं मजल मारली होती पण अत्यंत रोमहर्षक अशा फायनलमध्ये भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय महिला टीमनं फायनल हरली असली तरी भारतीयांची मन मात्र जिंकली होती.