मुंबई: IPL 2021 मध्ये कोरोना व्हायरसमुळे 31 सामने स्थगित करण्यात आले होते. आता हे सामने घेण्याचा निर्णय BCCIने घेतला आहे. या सामन्यांसाठी BCCI इंग्लंड क्रिकेट बोर्डसोबत चर्चा करत आहे. रद्द झालेले सामने UAE किंवा इंग्लंडमध्ये होणार अशी चर्चा होती. आता BCCI हे सामने इंग्लंडमध्ये घेण्याबाबत इंग्लंड क्रिकेट बोर्डाशी चर्चा करत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंग्लंड सीरिजच्या आधी हे सामने घेण्यासंदर्भात BCCIची इंग्लंड क्रिकेट बोर्डसोबत चर्चा सुरू आहे. क्रिकइन्फोने दिलेल्या वृत्तानुसार BCCIने इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाला (ईसीबी) या आठवड्यात इंग्लंड मालिका आठवड्यापूर्वी सुरू करण्यासाठी पत्र लिहिले आहे. मात्र,इंग्लंड बोर्डाकडून सीरिज लवकर घेण्याबाबत लिहिलेल्या पत्रावर कोणतंही उत्तर अजून मिळालेलं नाही. 


वेळापत्रकानुसार भारत विरुद्ध इंग्लंड सीरिज 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. ही सीरिज 14 सप्टेंबर रोजी संपेल. जर एक आठवड्यापूर्वी मालिका सुरू झाली तर ती 7 सप्टेंबरपर्यंत संपेल. 


BCCIने तयार केलेल्या प्लॅननुसार जर इंग्लंड विरुद्ध भारत सीरिज एक आठवडा लवकर संपली तर उर्वरित 3 आठवडे IPL 2021चे उर्वरित सामने खेळवले जाऊ शकतात. टी 20 वर्ल्डकप आधी या सामन्यांचं आयोजन करण्यात येणार आहे. 


14 नोव्हेंबरपासून टी 20 वर्ल्डकप आयोजित करण्यात येणार आहे. यंदा हा वर्ल्डकप भारतात आयोजित करण्यात आला आहे. मात्र वाढत्या कोरोनामुळे दुसऱ्या देशात देखील शिफ्ट केला जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.